Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:36 IST2025-04-21T18:32:07+5:302025-04-21T18:36:07+5:30

Numerology: राशीनुसार आपण साप्ताहिक भविष्य नेहमीच वाचतो. अंकशास्त्र ही देखील ज्योतिष शास्त्राची एक शाखा आहे. त्यात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवले जाते. प्रत्येकामाला आपला मूलांक शोधता येतो आणि त्यानुसार भविष्यही जाणून घेता येते. याठिकाणी आपण २७ एप्रिल पर्यंतचे भविष्य जाणून घेऊ.

आपल्या जन्मतारखेची बेरीज म्हणजे आपला मूलांक! त्यावरून आपले भविष्य सांगितले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार २१ एप्रिल रोजी सृष्टीत, विशेषत: अंतराळात मोठा बदल घडणार आहे. त्याचा प्रभाव आपल्या मूलांकावर कसा पडणार आहे ते जाणून घेऊ.

मुलांक १ : तुमची जन्मतारीख १, १०, १९, २८ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक १ असेल. या सप्ताहात कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नात्यांमध्ये अहंकार येऊ देऊ नका. कष्ट करा, नशीब बदलायला वेळ लागणार नाही.

मुलांक १ : तुमची जन्मतारीख १, १०, १९, २८ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक १ असेल. या सप्ताहात कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नात्यांमध्ये अहंकार येऊ देऊ नका. कष्ट करा, नशीब बदलायला वेळ लागणार नाही.

मूलांक ३ : तुमची जन्मतारीख ३,१२,२१,३० यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ३ असेल. कामाच्या ठिकाणी ठाम निर्णय घ्यावा लागेल. ध्येयावर लक्ष केंद्रित करा,प्रगती साधता येईल. नातेसंबंध दृढ होतील. चर्चेद्वारे प्रश्न सोडवणे उचित ठरेल.

मूलांक ४: तुमची जन्मतारीख ४,१३,२२,३१ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ४ असेल. तुम्हाला कामात आव्हाने किंवा अडचणी येऊ शकतात परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व काही ठीक होईल. खर्च वाढतील पण आनंद मिळेल. आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी मिळतील. घरात आनंद राहील.

मूलांक ५: तुमची जन्मतारीख ५,१४,२३ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ५ असेल. कामाच्या ठिकाणी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणे चांगले राहील, यामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. प्रेम जीवनातही संतुलित राहा, जास्त भावनिक होऊ नका. अकारण खर्च आणि वाद टाळा.

मूलांक ६ : तुमची जन्मतारीख ६,१५,२४ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ६ असेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात घेऊन येईल. तुमच्या कामाचे शुभ फळ तुम्हाला मिळेल. आनंदी आठवणी जोडल्या जातील. हा काळ तुम्हाला प्रगती, आनंद आणि समृद्धी देईल. प्रेम जीवन उत्तम राहील.

मूलांक ७ : तुमची जन्मतारीख ७,१६,२५ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ७ असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून नफा होईल. शुभ कार्यातून सुख-समृद्धी येऊ शकते. कामाच्या ठिकाणीही तुमची कामगिरी चांगली राहील.

मूलांक ८ : तुमची जन्मतारीख ८,१७,२६ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ८ असेल. नातेसंबंधांसाठी हा आठवडा चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीतून नफा होईल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. अहंकार टाळा. हुशारीने वागा.

मूलांक ९ : तुमची जन्मतारीख ९,१८,२७ यापैकी एक असेल तर तुमचा मूलांक ९ असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करू शकता. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवनात विचारपूर्वक निर्णय घ्या. मनाचा कौल ऐका. तरच नशीब तुमच्या बाजूने असेल.