Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 03:08 PM2024-11-18T15:08:42+5:302024-11-18T15:18:03+5:30

Numerology: नोव्हेंबर महिन्यात कधी आहे गुरुपुष्यामृत योग? कोणत्या मूलांकांना शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या...

Numerology: नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आगामी काळात गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. नोव्हेंबर महिन्यात गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृताचा मुहूर्त सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांपासून ते दुपारी ०३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.

पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. अंकशास्त्रानुसार, गुरुपुष्यामृत योग कोणत्या मूलांकासाठी कसा असू शकेल? आर्थिक आघाडी, गुंतवणूक, करिअर या क्षेत्रांवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होऊ शकेल. निर्णय घेताना जितके व्यावहारिक असाल तितके चांगले परिणाम मिळतील. आर्थिक प्रगती होऊ शकेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये वेळ अनुकूल राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले होईल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. यश मिळेल. प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकाल. आर्थिक प्रगतीच्या चांगल्या शक्यताही वाढत आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. जीवनात अनेक सुखद बदल दिसून येतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडून येऊ शकतील. आर्थिक खर्चही जास्त असतील. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. भागीदारीत केलेले प्रकल्प यशस्वी होतील. एखाद्या आनंददायी कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन पर्याय मिळू शकतात. करिअरच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. आर्थिक संपत्ती वाढण्याची चांगली शक्यता आहे. गुंतवणुकीतून संपत्ती वाढू शकेल. काही चांगली बातमी मिळू शकते.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. गुंतवणुकीतून बरेच फायदे मिळू शकतात. फायदा होऊ शकेल. परंतु, एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. कामात यशस्वी होऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नवीन गुंतवणुकीतून यश आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही चांगली बातमीही मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. धनलाभ होऊ शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. काही आर्थिक लाभ होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळले तर बरे होईल. सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. जीवनात काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्याने वाईट वाटेल. कामासंबंधित चिंता वाढू शकते. प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आर्थिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणीही मन अस्वस्थ राहू शकेल. भागीदारीत केलेल्या कामामुळे त्रास वाढू शकतो. कालांतराने सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.