Numerology: ‘या’ ६ मूलांकांना जानेवारी ठरेल जबरदस्त! २०२३ वर्षाची सुरुवात होईल दमदार; शुभ-लाभाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:19 PM2022-12-31T12:19:07+5:302022-12-31T12:25:37+5:30

Numerology: नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिना या ६ मूलांकांसाठी कसा असेल? कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना भरघोस लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.

सन २०२३ च्या पहिल्याच जानेवारी महिन्यात बुध, शुक्र आणि शनी हे ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, मंगळ ग्रह मार्गी होणार आहे. ग्रहांच्या या राशीपरिवर्तनाचा आणि चलनबदलाचा राशींसह मूलांकांवरही प्रभाव पडल्याचे पाहायला मिळू शकेल.

नवीन वर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिन्यातील ग्रहमानाचा कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या मूलांकांसाठी शुभ ठरू शकेल? तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल. नवीन लोकांच्या संपर्कात येतील जे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. महिन्याचे मधले दिवस खूप अनुकूल आहे. या कालावधीचा फायदा घ्या आणि प्रयत्न वाढवा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलांकांच्या व्यक्तींसाठी हा महिना सकारात्मक ठरू शकेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खास असणार आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून त्रास सहन करावा लागू शकतो. हनुमान चालिसाचे पठण करणे उपयुक्त ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींसाठी जानेवारीचा महिना अनुकूल ठरू शकेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. मोठे काम करण्याची प्रेरणा मिळेल. खूप व्यस्त असणार आहात. नोकरी व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा महिना पदोन्नती देणारा ठरू शकतो. दाम्पत्य जीवनात मतभेद निर्माण होऊ शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या मूलांकासाठी जानेवारीचा महिना यशकारक ठरू शकेल. तुमचे शत्रूही तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतील. इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमामुळे तुम्हाला या महिन्यात यश मिळण्याची अपेक्षा आहे. प्रलंबित योजना पूर्ण होऊ शकतील. या योजनांमधून आर्थिक लाभही मिळतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकासाठी हा महिना अनुकूल ठरू शकेल. आनंद देणाऱ्या घटना घडू शकतील. काही नवे विचार आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरतील. संगणक, सॉफ्टवेअर आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. समस्या आणि त्रासही या महिन्यात संपुष्टात येऊ शकतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा महिना संमिश्र ठरू शकतो. व्यापारात नफा मिळू शकतो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मन विचलित करणाऱ्या घटना घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घेणे हिताचे ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना महिनाभर सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुम्ही मोठी कामे पूर्ण करू शकाल. पहिल्या पंधरा दिवसात चिंतामुक्त होऊन काम कराल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ नफा कमाईचा ठरू शकेल. नोकरदार वर्गातील लोकांना बढती मिळू शकते. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. या महिन्यात भावनिक होऊन कोणतेही काम करू नका. आत्मविश्वासाने पुढे जा. मनापेक्षा बुद्धिने विचार करा. काही कारणास्ताव मन अस्वस्थ होऊ शकेल.