Numerology: 'हा' मूलांक असलेले लोक अधिक प्रगती करू शकत नाहीत; स्‍वभावातील ही समस्‍या ठरते बाधक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:46 PM2022-07-25T17:46:00+5:302022-07-25T17:51:19+5:30

प्रत्येक अंकावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा प्रभाव असतो आणि साधारणपणे तसाच प्रभाव व्यक्तीच्या स्वभावातही दिसून येतो.

अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जोडून, त्या आधारे त्याच्या स्वभावासंदर्भात आणि व्यक्तिमत्त्वासंदर्भात भाष्य केले जाते. जन्मतारखेच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भविष्यही सहजपणे समजू घेता येऊ शकते.

प्रत्येक अंकावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा प्रभाव असतो आणि साधारणपणे तसाच प्रभाव व्यक्तीच्या स्वभावातही दिसून येतो. आज आपण अशा लोकांसंदर्भात जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झाला होता. या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.

अंकशास्त्रानुसार, मूलांक 6 असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याचा परिणामही मूलांक 6 असलेल्या लोकांवर स्पष्टपणे दिसून येतो. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे हो लोक आकर्षक आणि सुंदरही असतात. मात्र, या लोकांत काही त्रुटी असतात, यामुळे या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर जाणून घेऊयात मूलांक 6 असलेल्या लोकांच्या स्वभावासंदर्भात

निर्णय घेण्याची क्षमता नसणे - अंकशास्त्रानुसार मूलांक 6 असलेल्या लोकांवर शुक्राचा प्रभाव असल्याने ते दिसायला आकर्षक, सुंदर आणि धैर्यवान असतात. हे लोक पहिल्याच भेटीत लोकांवर छाप सोडतात. या लोकांचे शरीर निरोगी असते. एवढेच नाही तर त्यांचे व्यक्तिमत्व जबरदस्त असते. ते लोकांशी खूपच चांगल्या पद्धतीने बोलतात. मात्र, या लोकांमध्ये काही त्रुटीही असतात. हे लोक प्रचंड आळशी असतात. या लोकांमध्ये कुठल्याही विषयावर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा अभाव असतो.

मूलांक 6 असलेले लोक एखादे काम करण्यापूर्वी त्यासंदर्भात अनेक वेळा विचार करतात. यानंतर ते काम करतात. महत्वाचे म्हणजे, या लोकांच्या आळशी स्वभावामुळे, त्यांचे कुठल्याही कामात मन लागत नाही आणि यामुळेच हे लोक इतरांवर अवलंबून असतात.

अश स्वभावामुळेच या लोकांची आर्थिक अथवा सामाजिक उन्नती होत नाही. तसेच, जे लोक आपला आळस कंट्रोलमध्ये ठेऊ शकतात, ते लोक जीवनात काही तरी साध्य करू शकतात आणि समाजात एक चांगल्या प्रकारचे आयुष्य जगतात.

लक्झरिअस वस्तूंचे शौकीन - शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक चैनीच्या अथवा लक्झरिअस वस्तूंचे प्रचंड शौकीन असतात. त्यांना चैनीचे जीवन जगणे अत्यंत आवडते. हे लोक महागड्या वस्तू खरेदी करतात. हे लोक जे काही कमावतात ते स्वतःवरच खर्च करतात. बचत करण्याकडे यांचे फारसे लक्ष नसते. यामुळे आयुष्यात काहीही सेव्हिंग्स करू शकत नाहीत. परिणामी या लोकांवर पश्चातापाची वेळ येते.

(टीप : येथे देण्यात आलेली माहिती ही सामान्य मान्यतांवर आधारीत आहे. लोकमत याची पुष्टी करत नाही.)