Numerology: 'या' तीन तारखांना जन्मलेले लोक असतात 'लकी'; आयुष्यभर सुखाची मिळते हमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:12 IST2025-02-27T15:09:39+5:302025-02-27T15:12:41+5:30
Numerology: श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेक जण आयुष्यभर खस्ता खातात. कोणाला कमी वयात यश मिळते तर कोणाची पूर्ण हयात कष्ट करण्यात निघून जाते. मात्र अंकशास्त्रानुसार काही लोकांना काबाड कष्ट न घेता सुख, संपत्ती, धन, लक्ष्मी सहज प्राप्त होतात. ते भाग्यवान कोण ते जाणून घेऊ.

अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे तिचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य सांगितले जाते. यासाठी, जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो. ज्योतिषशास्त्राच्या १२ राशींप्रमाणे अंकशास्त्रात १ ते ९ क्रमांकापर्यंतच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले आहे. आज आपण त्या मूलांकाबद्दल जाणून घेऊया, ज्यांना संपत्तीबरोबरच प्रसिद्धीही मिळते. यासाठी आधी मूलांक कसा काढतात ते पाहू.
मूलांक कसा काढावा?
आपल्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज म्हणजे आपला मूलांक. हा १ ते ९ मध्ये या दरम्यान असतो. जसे की ३ तारीख असेल तर ०+३=३ मूलांक ३ आणि १२ तारीख असेल तरी १+२=३ मूलांक तीन आणि ३० तारीख असेल तरी ३+०=३ अशा पद्धतीने मूलांक काढला जातो. तर इथे आपण ज्या भाग्यवान मूलांकाबद्दल बोलत आहोत त्यांची जन्मतारीख जाणून घेऊ.
भाग्यवान मूलांक ६ :
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ येतो. मूलांक ६ चा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र ग्रह संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य यांचा कारक आहे. शुक्राच्या कृपेने मूलांक ६ चे लोक श्रीमंत होतात आणि शाही जीवन जगतात. त्यांच्या आयुष्यात भौतिक सुखाची उणीव कधीही भासत नाही.
प्रसिद्धी पायाशी लोळण घेते :
या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत चुंबकत्त्व असते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. लोकांना ते खूप आवडतात. त्यांचे बोलणे, त्याची वागणे, राहणीमान, स्वभाव या सर्व गोष्टी लोकांना आकर्षित करतात. म्हणूनच ते ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे तिथे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करतात.
नम्र आणि सामाजिक :
६ मूलांकाचे लोक चांगले जीवन जगतात आणि इतरांना मदत करण्यातही पुढे असतात, त्यामुळे त्यांना खूप आदर मिळतो. तसेच ते स्वभावाने नम्र असतात. त्यांच्या हातून सामाजिक कार्यही चांगले घडते. कौटुंबिक, सामाजिक आयुष्य समाधानाने व्यतीत करतात.
प्रेमळ स्वभाव आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व :
६ मूलांकाचे लोक महागड्या वस्तूंचे खूप शौकीन असतात. याशिवाय ते सढळ हाताने खर्च करतात. हे लोक सौंदर्याकडे सहज आकर्षित होतात. त्यांचे लव्ह लाईफ चांगले असते. जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि मोबदल्यात त्यांनाही भरभरून प्रेम मिळते.