Palmistry: कृष्णाप्रमाणे तुमच्याही तळहातावर कमळाचं, धनुष्याचं शुभ चिन्ह आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:44 PM2024-11-19T15:44:40+5:302024-11-19T15:59:16+5:30

Palmistry: श्रीकृष्ण या नावातच मांगल्य आहे. त्याचे वागणे, बोलणे, दिसणे सगळे काही आकर्षक होते. कृष्ण या शब्दाचाच मूळ अर्थ आहे आकर्षून घेणारा. तसे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतेच. शिवाय सामुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात, त्याच्या शरीरावर काही मंगल चिन्हे होती. तशी चिन्हे आपल्याही शरीरावर असतील तर ते भाग्याचे लक्षण आहे असे समजायला हरकत नाही!

ही चिन्हे एखाद्याच्या शरीरावर असतील तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. ही शुभ चिन्हे व्यक्तीला अत्यंत श्रीमंत, समृद्ध बनवतात. असे लोक देशात आणि जगात प्रसिद्ध होतात आणि सर्व सुख प्राप्त करतात. चला जाणून घेऊया या शुभ चिन्हांबद्दल.

शंख- हिंदू धर्मात शंख अत्यंत शुभ मानला जातो. माता लक्ष्मीलाही तो खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या तळव्यावर शंखाची खूण होती असेही मानले जाते. यासोबतच त्यांनी हातातही शंख धरला आहे. त्यामुळे ज्यांच्या तळहातावर किंवा तळपायावर शंखाची खूण असते ते खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यात अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळते.

अर्धचंद्र - श्रीकृष्णाच्या दोन्ही हात जोडले असता अर्धचंद्राचे चिन्ह तयार होते असे. चन्द्र हा शीतलता आणि वैवाहिक सुख देणारा मानला जातो. भगवान शिवानेदेखील कपाळावर अर्धचंद्र धारण केला आहे. त्यामुळे ज्या लोकांचे दोन्ही तळहात जोडून अर्ध चंद्राची रेघा पूर्ण दिसते अशा लोकांना प्रेमासाठी झुरत बसावे लागत नाही.

माशाची खूण- श्रीकृष्णाच्या तळहातावर आणि तळपायावर माशाचे चिन्ह होते. ज्यांच्या अंगावर माशाची खूण असते, त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते. या लोकांकडे भरपूर पैसा असतो, त्याचप्रमाणे त्यांना खूप प्रतिष्ठाही मिळते.

हातावर तीळ- हातावर तीळ असणे खूप चांगले मानले जाते. असे लोक कठोर परिश्रम करून श्रीमंत होतात. काही लोकांना वारसाहक्काने भरपूर संपत्तीही मिळते. असे लोक सुखी वैवाहिक जीवन जगतात.

धनुष्य किंवा बाण- हातावर किंवा पायावर धनुष्य बाणाचे चिन्ह असणे देखील खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना संघर्ष करावा लागतो पण ते जीवनात मोठे यश मिळवतात.