तुमच्या तळहातावर आहे का J ते N अक्षरांसारखी खूण; नेमका अर्थ काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:20 PM2022-04-20T20:20:57+5:302022-04-20T20:30:56+5:30

आपल्या प्रत्येक हस्तरेषांमध्ये नक्कीच काहीतरी खास असते. तळहातावरील आडव्या रेषा काही लोकांच्या हातात इंग्रजीच्या काही अक्षरांसारखा आकार बनवतात.

आपल्या प्रत्येक हस्तरेषांमध्ये नक्कीच काहीतरी खास असते. तळहातावरील आडव्या रेषा काही लोकांच्या हातात इंग्रजीच्या काही अक्षरांसारखा आकार बनवतात. हस्तरेषाशास्त्रात, इंग्रजीतील या अक्षरांप्रमाणे आकार पाहून भविष्याबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला हातच्‍या रेषांमध्‍ये तयार होणाऱ्या J ते N अक्षरांशी संबंधित खास गोष्टी सांगणार आहोत.

जर तुमच्या हस्तरेषांमधून इंग्रजीच्या J अक्षराची आकृती बनत असेल तर ते भगवान विष्णूचं आवडतं शस्त्र चक्राशी संबंधित असल्याचं मानलं जातं. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात शॉर्टकटचा अवलंब करून यशाचा मार्ग निश्चित करायचा असतो असं मानलं जातं. तसंच असं चिन्ह त्या व्यक्तीच्या उजव्या हातावर असेल तर ते त्या व्यक्तीच्या आईसाठी धोक्याचं ठरण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जातं. जर महिलांच्या डाव्या हातावर हे चिन्ह असेल तर अशा महिलांनी गरोदरपणात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

जर एखाद्या व्यक्तीच्या हस्तरेषांवरून इंग्रजीतील K अक्षर बनत असेल तर ते चांगलं मानलं जात नाही. अशी रेषा तळहाताच्या मध्यभागातून सुरू होऊन शनीच्या बोटापर्यंत म्हणजे मध्यमेपर्यंत जाते. ही रेषा डाव्या हातातही असू शकते. अशा रेषेमुळे व्यक्तीच्या भाग्योदयात बाधा येण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जातं. त्यांना अथक प्रयत्नांनंतरही आपल्या करिअरमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. तसंच नोकरीत बढतीसाठीही त्यांना खुप संघर्ष करावा लागत असल्याचं म्हटलं जातं.

या व्यक्तींच्या हातावर L अक्षरासारखी आकृती दिसत असेल अशा व्यक्तींच्या कुंडलीत केतूची स्थिती अतिशय शुभ असते. हातावरील हे चिन्ह व्यक्तीच्या दीर्घायुष्याचं आणि निरोगी शरीराचे प्रतिक मानले जाते. अशा व्यक्ती आपल्या जन्मस्थानापासून दूर जाऊन काम करतात तेव्हाच त्यांचं नशीब चमकतं असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं.

या व्यक्तींच्या हातावर इंग्रजीतील M सारखं चिन्ह दिसत असेल त्या व्यक्ती सुशिक्षित आणि बुद्धीवान असतात. त्या व्यक्तींना ज्योतिष, अध्यात्म, इतिहास आणि वास्तूशास्त्रासारख्या विषयांमध्ये अधिक रस असतो. त्यांचा मेंदूही एखाद्या कंम्प्युटरप्रमाणे काम करतो असं म्हटलं जातं. जर हातावरील M या चिन्हाला सूर्यरेषाही मिळत असेल तर हे अधिक चांगलं मानलं जातं. असे लोक विशेष यश आणि प्रसिद्धी मिळवतात.या व्यक्तींचा जन्म चंद्रग्रहणाच्या वेळी होतो त्यांच्या हातावर N सारखं चिन्ह दिसून येतं असं म्हटलं जातं. अशा रेषा राहू क्षेत्रातून बाहेर पडताना दिसतात. कोणत्याही व्यक्तीच्या हातातील अशी रेषा अचानक होणाऱ्या बदलांची माहिती देते. जर N सारखं चिन्ह भाग्यरेषेला मिळताना दिसत असेल तर अशा व्यक्तीला कमी वयातच यश मिळतं, असं म्हटलं जातं.

या व्यक्तींचा जन्म चंद्रग्रहणाच्या वेळी होतो त्यांच्या हातावर N सारखं चिन्ह दिसून येतं असं म्हटलं जातं. अशा रेषा राहू क्षेत्रातून बाहेर पडताना दिसतात. कोणत्याही व्यक्तीच्या हातातील अशी रेषा अचानक होणाऱ्या बदलांची माहिती देते. जर N सारखं चिन्ह भाग्यरेषेला मिळताना दिसत असेल तर अशा व्यक्तीला कमी वयातच यश मिळतं, असं म्हटलं जातं.