पंचग्रही, ग्रहण योगात होळी: ७ राशींना ७ राजयोगांचा लाभ, धनलक्ष्मी कृपा; भरघोस भरभराट काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 08:47 IST2025-03-12T08:36:06+5:302025-03-12T08:47:22+5:30
Holi 2025 Astrology: सन २०२५ ची होळी अनेकार्थाने विशेष मानली गेली आहे. जुळून येत असलेले ७ राजयोग कोणत्या राशींना सर्वोत्तम वरदानाचे ठरू शकतात? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

Holi 2025 Astrology: गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी होळी आहे. शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रंगांचा सण म्हणून होळीची ओळख वेगळी आहे. मराठी वर्षातील शेवटचा मोठा सण म्हणून होळी साजरी केली जाते. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. यंदा २०२५ रोजी होळी सणाला विविध योग जुळून येत आहेत.
मीन राशीत बुध, शुक्र, राहु, नेपच्युन ग्रह विराजमान आहेत. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. मीन राशीत आताच्या घडीला मालव्य राजयोग, लक्ष्मी नारायण योग जुळून आले आहेत. फाल्गुन पौर्णिमा, धुलिवंदनाच्या दिवशी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मीन राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर बुधादित्य, शुक्रादित्य राजयोग जुळून येतील. तसेच ग्रहण योगही जुळून येणार आहे. राहु-केतु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे. तसेच गुरु-चंद्र यांचा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे.
विशेष म्हणजे यंदा होळी सणाला चंद्रग्रहण असणार आहे. कन्या राशीत केतु विराजमान आहे. हे चंद्रग्रहण कन्या राशीत असेल. एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्यामुळे सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योग जुळून आला आहे. तसेच चंद्रही कन्या राशीत असल्यामुळे सूर्य-चंद्राचाही समसप्तक योग जुळून आला आहे. एकूणच ग्रहस्थितीचा विचार केल्यास कोणत्या राशींना होळीचा सण भाग्योदय करणारा, जीवनात यश, प्रगती, सुख-समृद्धी, आनंदाच्या रंगांची तेजस्वी उधळण करणारा ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
मेष: कामाची कदर होऊ शकेल. व्यवसायात भरभराट होईल. मनात आनंदी विचार राहतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. कुणाच्या सांगण्यावरून हुरळून जाऊ नका. नोकरीत नवीन संधीची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. ओळखीचे फायदे घेण्यात मागे राहू नका. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. शनिवारी महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो.
वृषभ: शुभ फळे मिळतील. उत्तम फायदे देणारा काळ ठरू शकेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भावंडांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. घरात काही कारणाने धावपळ राहील. कामातील बदलांमुळे व्यस्तता वाढेल. शनिवारी सामाजिक कार्यात जपून वागा. सावधपणे मते व्यक्त करा. अन्यथा गैरसमज होऊ शकतात.
मिथुन: अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मालमत्तेच्या कामात फायदा होईल. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. हाती पैसा खेळता राहील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या. शनिवारी संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही फायदे होतील. तर काही बाबतीत तणाव राहील. एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळेल.
कर्क: थोडी दगदग होईल. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडून येतील. जमा-खर्चाचे नियोजन नीट करा. परिस्थिती आटोक्यात येईल. मनात आत्मविश्वास राहील. नोकरीत ताण कमी राहील. त्यामुळे स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होईल. मौजमजा कराल. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. शनिवारी भावंडांशी गैरसमज होऊ शकतात.
सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. जुनी येणी वसूल होतील. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. काही अनपेक्षित लाभ होतील. तर काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. कायद्याची बंधने पाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. अडचणी दूर होतील. प्रियजनांच्या सहवासात याल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल.
कन्या: नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. मोठ्या संधीची चाहूल लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महागड्या वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.
तूळ: ग्रहमान अनुकूल राहील. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल. समाजात मान वाढेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. पण थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळा.
वृश्चिक: अनेक उत्तम लाभ होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र, वाहने जपून चालवा. चांगल्या बातम्या कळतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मान-सन्मान मिळेल. कामाची प्रशंसा केली जाईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळेल. मुत्सद्दीपणाने वागून कामे करून घ्या. कामाचा ताण घेऊ नका. काही कामे यथायोग्य वेळीच होतील.
धनु: अनुकूलतेचा अनुभव येईल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. प्रियजनांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाजू बळकट राहील. बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. अचानक धनलाभ होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. भाग्याची चांगली साथ राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. लोकांशी चांगले संबंध राहतील. नोकरीत प्रगती होईल.
मकर: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. व्यवसायात दगदग होईल. आर्थिक आवक चांगली राहील. परिश्रम करावे लागले तरी त्याचे काही वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. लोकांवर फार विश्वास न ठेवलेलाच बरा. भेटवस्तू मिळतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारपासून परिस्थिती निवळेल. एखादी चांगली बातमी कळेल.
कुंभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. फार घाईघाईत कामे करू नका. कामात विलंब होत असल्याचा ताण घेऊ नका. चांगली परिस्थिती राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मात्र, त्यांना पुरून उराल. शुक्रवार, शनिवार महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांशी बरोबरी करू नका. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.
मीन: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी कराल. समाजात मान वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत मोठी संधी मिळू शकते. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. यशामुळे काही लोकांना मत्सर वाटेल. त्यामुळे प्रत्येक बाब लोकांना सांगितलीच पाहिजे असे नाही, हे लक्षात घ्यावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.