टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या विठ्ठलाचं साजिरं रूप डोळ्यांत साठवून घ्यायचंय, त्याच्यापुढे नतमस्तक व्हायचंय, या 'माऊली'ला बरंच काही सांगायचंय, तिच्याकडून नवं बळ घ्यायचंय. विठुरायाबद्दलची ही अपार श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. हे भाव आपल्या कॅमेऱ्यात नेमके टिपले आहेत, व्यावसायिक छायाचित्रकार हर्षल निकाळे यानं. https://www.instagram.com/harshalnikale/ या त्याच्या इन्स्टा पेजवर तुम्हाला छायाचित्ररुपी वारी अनुभवता येईल. त्यातलेच ११ मनोहारी फोटो खास आपल्यासाठी...