जय हरी विठ्ठल! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांनी सजावट, पाहा, Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:40 IST2025-01-01T10:35:24+5:302025-01-01T10:40:11+5:30

नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे.

इंग्रजी नववर्ष २०२५ ची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक आपापल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जात असतात.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे.

नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे.

वर्षभर विविध शुभ दिनी तसेच विशेष दिवशी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अशाच पद्धतीने आकर्षक आरास केली जाते.

पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते. तर काही जण नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेत असतात.

आषाढी आणि कार्तिकी वारी हा तर वारकरी आणि भाविकांसाठी अद्भूत आनंदाचा दिव्य सोहळा असतो.

वारी करणे शक्य नाही, ते वर्षातून एकदा पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणी मातेचे आवर्जून दर्शन घेतात.

विठ्ठल नामाच्या गजराने विठ्ठल मंदिर आणि परिसर दणाणून जातो. विठ्ठल नामात तल्लीन भाविकांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा असतो.

नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी केलेली सजावट अतिशय देखणी करण्यात आली आहे.

तुम्हीही संकल्प करून वर्षभरातून एकदा तरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन अवश्य घ्यावे. राम कृष्ण हरी...