Pitru Paksha 2022: आपण जसे रोज देवाचे आभार मानतो, तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला, संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली, त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले आहेत. खरे पाहता त्यांचे स्मरण रोजच केले पाहिजे, परंतु रोज शक्य नसेल तर निदान पितृपक्षात त्यांच्या प्रति ऋणनिर्देश म्हणून पितृश्राद्ध करायचे असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे पुरेसा वेळ नाही, असलाच तर मार्गदर्शन करणारे कोणी नाही, दोन्ही असले तरी हे करण्याची कोणाला गरज वाटत नाही तर कोणाला आवड वाटत नाही. यासर्वातुन तुम्हाला आवड, निवड आणि पुरेशी सवड असेल तर पितृपक्षात पुढीलपैकी कोणत्याही एका उपायांचा अवलंब करता येईल. ते उपाय जाणून घेऊ.