Pitru Paksha 2023: ऐन पितृपक्षात कावळ्यांचे घराच्या दारं-खिडक्यांवर येणे हे तर शुभ लक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:32 AM2023-10-02T10:32:15+5:302023-10-02T10:42:39+5:30

Pitru Paksha 2023: सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रोज येणारे कावळे नेमके नैवेद्य ठेवल्यावर गायब होतात अशी अनेकांची तक्रार असते. परंतु तुमच्या बाबतीत विरुद्ध गोष्ट घडत असेल तर पितृपक्षात कावळ्यांचे दर्शन तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत, असे तुम्ही समजू शकता.

आपल्याला कावळ्याची काव काव कटकट वाटते, पण संत ज्ञानेश्वर त्यातूनही शुभ संकेत शोधत म्हणतात, 'पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' यावरून ज्योतिष शास्त्र सुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा संबंध शुभ-अशुभाशी कसा जोडला गेला ते सांगत आहे.

शुभ-अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनावर सकारात्मक-नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात. हे शकुन शतकानुशतके प्रचलित आहेत. आज आपण अशा पक्ष्याशी संबंधित शकुन आणि अपशकुनाबद्दल जाणून घेणार आहोत, जो सर्वत्र आढळतो. हा पक्षी आहे कावळा. कावळ्याशी संबंधित असलेल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांबद्दल जाणून घेऊ.

>> जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठूनतरी खूप पैसा मिळणार आहे. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते.

>> त्याचबरोबर सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्याची दीर्घकाळ काव काव शुभ मानली जाते. हे घडणे एखाद्या पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण आहे, तसेच हा कार्यक्रम मान-सन्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण आहे.

>> तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण आहे.

>> आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे.

>> पितृपक्षाचा नैवेद्य खाऊन झाल्यावरही कावळा शांतपणे बसून राहत असेल तर तुमचे पितर तुमच्यावर संतुष्ट आहेत.