पितृपक्ष: प्रारंभी चंद्रग्रहण, समाप्तीला सूर्यग्रहण; ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना खडतर काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 11:58 AM 2024-09-18T11:58:51+5:30 2024-09-18T12:13:39+5:30
यंदाच्या पितृपक्षात वेगळाच योग जुळून आला आहे. पितृपक्षाची सुरुवात होताना चंद्रग्रहण लागत असून, सर्वपित्री अमावास्येला सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या... Pitru Paksha 2024 Chandra Grahan And Surya Grahan: जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. १८ सप्टेंबर रोजी महालयारंभ म्हणजेच पितृपक्ष, पितृपंधरवड्याची सुरुवात होणार आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यावेळी चंद्र मीन राशीत असेल. मीन राशीत राहु विराजमान आहे. पितरांचे स्मरण करण्यासाठी आणि श्राद्ध तसेच तर्पण करून पितरांना प्रसन्न करण्याचा हा काळ मानला जातो.
Lunar Eclipse And Solar Eclipse In Pitru Paksha 2024: विशेष म्हणजे ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी पितृपक्ष समाप्त होत आहे. या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. या दिवशी चंद्र कन्या राशीत असणार आहे. विशेष म्हणजे सूर्यही कन्या राशीत असेल. कन्या राशीत केतु विराजमान आहे.
यंदाच्या वर्षी पितृपक्षात दोन्ही ग्रहणे येत असल्याने हा वेगळाच योग मानला जात आहे. पितृपक्ष आणि ग्रहणे यांमध्ये काही शुभ कार्ये केली जात नाहीत. परंतु, ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत, त्यामुळे याचे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. असे असले तरी या पितृपक्षातील या दोन्ही ग्रहणांचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
मेष: करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. व्यक्तींसोबतच्या नात्यात बदल पाहायला मिळू शकतात. ही व्यक्ती जोडीदार, भागीदार, चांगला मित्र किंवा शत्रू, हितचिंतक असू शकतो. हा काळ नाते अधिक दृढ करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे संपवण्यास प्रेरित करू शकतो.
वृषभ: मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी मित्रांकडून मदत मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. प्रेम जीवनात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात समन्वय राहू शकेल.
मिथुन: पैशाशी संबंधित समस्या संपण्याचा मार्ग सापडू शकेल. आगामी कालावधी लाभदायक ठरू शकतो. काही फायदे मिळू शकतात. विवाहात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. काही चांगली बातमी मिळू शकते. काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे हिताचे ठरू शकेल.
कर्क: शैक्षणिक कार्यात यश मिळू शकते. करिअरमध्ये बदल जाणवण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. हे बदल वैयक्तिक जीवनावर परिणाम करू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावा.
सिंह: ऑफिसमध्ये एखाद्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदारांसाठी हा कालावधी फलदायी ठरू शकेल.
कन्या: व्यापाऱ्यांना नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. पद, पैसा आणि प्रतिष्ठा लाभू शकते. बढती मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे आगामी काळात चांगला नफा मिळेल.
तूळ: मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. या काळात कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तिथे काळजी घेण्याची गरज आहे.
वृश्चिक: आगामी काळ चांगला ठरू शकतो. व्यवसायात तसेच प्रेम जीवनात चांगले यश मिळवू शकतात. योगासने करणे हिताचे ठरू शकेल. कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. शैक्षणिक आघाडीवर चांगली बातमी मिळू शकते.
धनु: आर्थिक स्थितीवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात खर्चात लक्षणीय वाढ होईल. अनेक कामे अपूर्ण राहू शकतात. कालांतराने व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील.
मकर: या काळात जीवनात समस्या येऊ शकतात. आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठांशी मतभेद होऊ शकतात, हे चांगले ठरणारे नाही. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
कुंभ: उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखावा लागेल. अन्यथा आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जे काही काम कराल ते यशस्वी होईल. एखादे महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा काम मिळू शकते.
मीन: लाभ मिळू लागतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतात. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत गोष्टींत यश मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.