४ ग्रहांचे जुलैत राशीपरिवर्तन: ६ राशींना नशिबाची साथ, भाग्याचा काळ; अनेकविध लाभ, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 07:07 AM2023-06-25T07:07:07+5:302023-06-25T07:10:02+5:30

अवघ्या काही दिवसांनी जुलै महिन्याला सुरुवात होईल. ग्रहांचे गोचराचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर दिसून येईल? कोणत्या राशी लकी ठरू शकतील? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, वेळोवेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. जुलै महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. चातुर्मासाचा काळ सुरू झालेला असेल. विशेष म्हणजे अधिक मास जुलै महिन्यात सुरू होत आहे. गुरुपौर्णिमेसह अन्य काही महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जातील.

यासह नवग्रहांपैकी ४ महत्त्वाचे ग्रह जुलै महिन्यात राशीपरिवर्तन करणार आहेत. ३० जून रोजी नवग्रहांचा सेनापती मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र ग्रह ०६ जून रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह ०८ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर जुलै महिन्यात बुध ग्रह पुन्हा राशीपरिवर्तन करणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत प्रवेश केलेला बुध २४ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

ग्रहांच्या या राशीपरिवर्तनामुळे विविध प्रकारचे शुभ योगही जुळून येत आहेत. ४ ग्रहांच्या गोचराचा काही राशीच्या व्यक्तींना अपार लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरीत प्रमोशन, व्यापारात नफ्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. नेमक्या कोणत्या राशी लकी ठरू शकतील, कोणाला भाग्याची साथ लाभेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर शुभ ठरू शकेल. ग्रहांचे शुभ परिणाम अडथळे दूर करतील. ध्येय साध्य करण्यात मदत होईल. सर्व कामे एक-एक करून हुशारीने पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांना करिअर वाढीच्या नवीन संधी मिळतील. ग्रहांच्या शुभ परिणामांमुळे शौर्य आणि साहस वाढेल. प्रशासकीय लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. भावंडांमध्ये चांगला समन्वय राहील. एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर राहू शकतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर लाभदायक ठरू शकेल. बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने जुळून येणारा बुधादित्य योग संवाद कौशल्य आणि बौद्धिक क्षमता वाढवू शकेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. भविष्यात चांगले लाभ मिळतील. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत होईल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य लाभेल. पद आणि प्रभाव वाढू शकेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर सकारात्मक ठरू शकेल. सुसंवाद, आनंद आणि आर्थिक लाभ मिळेल. खेळाडूंची चांगली प्रगती होऊ शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आगामी काळ फायदेशीर ठरू शकेल. चांगल्या संधी मिळू शकतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. सामाजिक स्तर वाढू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर लाभाचे ठरू शकेल. आत्मविश्वास आणि खंबीरपणा वाढेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा कालावधी अनुकूल ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगल्या संधी घेऊन येत आहे. परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायात बुद्धिमत्तेचा वापर करून उत्कृष्ट काम करू शकाल. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. मुलांच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील. अडकलेला पैसाही प्राप्त होऊ शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर शुभ ठरू शकेल. बौद्धिक क्षमता वाढू शकेल. आध्यात्मिक वाढ, उच्च शिक्षण, प्रवासासाठी हा काळ अनुकूल राहील. नाती मजबूत होऊ शकतील. स्वतःचा व्यवसाय करत आहेत ते चांगले प्रदर्शन करू शकतील. नफा कमावू शकतील. प्रियजनांशी समन्वय वाढेल. अनेक रखडलेली सरकारी कामे सहज पूर्ण होतील.

मीन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर शुभ ठरू शकेल. आर्थिक लाभ आणि विपुलता मिळू शकेल. गुंतवणुकीसाठी, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी, व्यवसायासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे ध्येय साध्य करण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. नेतृत्व क्षमतेत वाढ होईल. पराक्रमात वाढ होईल. कुटुंबाचा सामाजिक स्तर उंचावू शकेल. कुटुंबात सरकारी नोकरी मिळू शकते. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल.

सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. याशिवाय सिंह राशीत बुधाच्या राशीपरिवर्तनानंतर मंगळ, शुक्र आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. त्याशिवाय लक्ष्मी-नारायण नामक शुभ योग जुळून येऊ शकेल. याचेही शुभ परिणाम काही राशीच्या लोकांना मिळू शकतील.

जुलै महिन्यात अधिक मास सुरु होत आहे. या कालावधीत नवग्रहांचा राजा असलेला सूर्य राशीपरिवर्तन करत नाही. म्हणून याला मलमास म्हटले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.