Rahu 2023: नव्या वर्षात या 5 राशीच्या लोकांना अधिक त्रास देणार राहु, तूळ राशीसह यांना रहावे लागेल सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:40 PM2022-12-19T18:40:48+5:302022-12-19T18:52:56+5:30

2023 मध्ये राहुची चाल कशी असेल? यावर दृष्टी टाकली असता, 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत असेल. यानंतर तो मेष मधून देव गुरुच्या मीन राशीत जाईल.

ज्योतिष शास्त्रात शनीनंतर राहुची चाल सर्वात हळू असते. महत्वाचे म्हणजे, राहु नेहमीच वक्री चालतो आणि जवळपास दीड वर्षांनंतर, आपली रास बदलतो. 2023 मध्ये राहुची चाल कशी असेल? यावर दृष्टी टाकली असता, 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत असेल. यानंतर तो मेष मधून देव गुरुच्या मीन राशीत जाईल. या पार्श्वभूमीवर ज्योतीश तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की नव्या वर्षात राहु एकूण पाच राशीच्या लोकांना फार अधिक त्रास देऊ शकतो. तर त्या राशींसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

मेष - या वर्षात राहु आपल्याला काही प्रमाणात गोंधळात टाकेल. आपण प्रत्येक कामात घाई कराल, यामुळे आपल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. या दरम्यान, आपल्यासोबत काही मोठे षड्यंत्रही होऊ शकते. आपले लोकांसोबत भांडण अथवा वाद वाढू शकतात. घरातील सदस्यांसोबतही आपले वाद होऊ शकतात. यामुळे, या काळात अतीशय सावध रहायला हवे.

वृषभ - नव्या वर्षात राहु आपला खर्च वाढवणारा ठरेल. तो आपल्याला विनाकारण खर्च करायला भाग पाडेल आणि आपणही विचार न करता पैसे खर्च कराल. राहु तुम्हाला मानसिक दृष्ट्या त्रास देऊ शकतो. याकाळात, शॉर्टकट पद्धतीने यश मिळवण्याची आपली सवय आपल्यालाच अडचणीत आणू शकते. याच बरोबर, आपल्याला शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. यामुळे, रुग्णालयाच्या फेऱ्याही माराव्या लागू शकतात.

तूळ - व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला अधिक निरंकुश असल्यासारखे वाटू शकते. आपण अनेक वेळा विचार न करताच निर्णय घ्याल. यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायात नुकसानही होऊ शकते. आपल्याला आपल्या बिझनेस पार्टनरसोबतही सावधगिरीने वागावे लागेल. या काळात लोकांसोबत आपले शुल्लक कारणांवरून खटके उडत जातील. याचबरोबर, नोकरी करणाऱ्या लोकांनाही काळजीपूर्वक रहावे लागेल. कारण कामाच्या ठिकाणीही सहकाऱ्यांसोबत वाद वाढू शकतात.

मकर- राहु आपल्या आयुष्यात काहीशी अस्थिर स्थिती निर्माण करेल. कौटुंबिक संबंध कमकुवत होऊ शकते. यामुळे,आपल्याला आपल्या कौटुंबिक जीवनात सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. या काळात घरातील स्थितीही काहीशी अशांत राहु शकते. आपल्या वैवाहिक जीवनात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे आपल्याला शांततेत काम करावे लागेल. मोठ्या मोठी गोष्टही शांततेने आणि संयमाने समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.

मीन - येणाऱ्या वर्षात राहु आपल्याला चांगली संपत्ती मिळवून देईल. पण, आपण संपत्तीच्या जेवढे जवळ जाल तेवढेच कुटुंबापासूनही दूर व्हाल. यामुळे आपल्याला अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. तर दुसरीकडे, असंतुलित भोजन अथवा खाण-पाणामुळे आपले प्रकृतीही बिघडू शकते. यामुळे आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.