१४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:00 AM2022-06-09T08:00:20+5:302022-06-09T08:15:21+5:30

राहुच्या नक्षत्रबदलाचा नेमक्या कोणत्या राशींना कसा लाभ मिळू शकेल, अन्य राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...

जून महिन्यात नवग्रहांचे अतिशय महत्त्वाचे असे स्थानबदल, राशीपरिवर्तन होताना पाहायला मिळत आहे. नवग्रहांमध्ये छाया ग्रह मानल्या गेलेल्या राहु-केतुचाही समावेश आहे. हे दोन्ही छाया ग्रह असले, तरी या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाला तितकेच महत्त्व आहे. राहु-केतुच्या प्रभावामुळे राजाचा रंक अन् रंकाचा राजा होऊ शकतो, अशी मान्यता आहे. (rahu transit bharani nakshatra june 2022)

आताच्या घडीला राहु मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे, तर केतु शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत आहे. विशेष म्हणजे राहु आणि केतु कायम वक्री चलनाने राशीबदल करत असतात. सन २०२२ च्या एप्रिल महिन्यात या दोन्ही ग्रहांनी सदर राशीत प्रवेश केला असून, सुमारे दीड महिना ते याच राशीत असतील. तसेच सध्या सुख-समृद्धीकारक शुक्र ग्रह देखील मेष राशीतच विराजमान आहे. शुक्र आणि राहु मित्र ग्रह मानले गेले आहे. (rahu in bharani nakshatra 2022)

शुक्र आणि राहुची युती विशेष फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जाते. तसेच राहु कृतिका नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्रात पुढील सुमारे २४६ दिवस राहु विराजमान असेल, असे म्हटले जात आहे. भरणी नक्षत्राचे स्वामित्व शुक्राकडे असून, याची देवता यम आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानला जात आहे. याच देश-दुनियेसह राशींवरही प्रभाव पडेल. नेमक्या कुठल्या राशीच्या व्यक्तींना पुढील काळ उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया... (rahu gochar in bharani nakshatra 2022)

राहुच्या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक स्थितीत फायदा होऊ शकेल. प्रगती करता येईल. उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांना धनसंपत्ती देऊ शकेल. त्यांना लाभाच्या अनेक संधी मिळतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती कराल. पदोन्नती होईल. प्रवासातून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मिथुन राशीच्या लोकांना उत्तम ठरू शकेल. आगामी काळात सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतील. शेअर बाजारातून आर्थिक लाभ आणि अचानक आर्थिक लाभाचे योग राहतील. आरोग्य सामान्य राहील.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. कर्मस्थानी गुरू असल्याने त्याचे पाठबळ मिळू शकेल. कार्यक्षेत्रात कामाचे समाधान घेऊ शकाल. सुखासह आनंद द्विगुणित होऊ शकेल. मात्र, वाहन चालवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. परदेशातून काहीतरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र ठरू शकेल. हितशत्रूंपासून सावध राहावे. तसेच कठोर निर्णय घेणे टाळावे. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. बाकी स्थिती सामान्य राहू शकेल.

राहुच्या नक्षत्राच्या बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. तुम्ही सहलीला जाऊ शकता. आनंदाचा काळ जाईल.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांना संमिश्र ठरू शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. दाम्पत्य जीवनात काही काळासाठी तणाव निर्माण होऊ शकेल. समाजातील प्रतिमा मलिन होणार नाही, याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येऊ शकतील. नोकरदार, व्यवसायिक मंडळींना लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. तसेच मीडिया, एनजीओ यांसारख्या संस्थांकडून लाभ होऊ शकेल.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. चौथ्या भावात असलेला राहु नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतील. करिअरमध्ये मोठे बदल झाले, तरी ते तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतील.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींना भाग्यकारक ठरू शकेल. तृतीय भावातील राहू सुखेश्वर भाग्यवान असल्याने मेहनतीचे उत्तम फलप्रदान करू शकेल. नशीब चमकेल. मात्र, नातेवाइकांसोबतचे नातेसंबंध योग्य पद्धतीने हाताळावे लागतील. प्रवास फायदेशीर ठरू शकतील.

भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकेल. एकीकडे, धनभावातील राहु असल्यामुळे कार्यक्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. पण, दुसरीकडे काही कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे.