राहु नक्षत्र गोचर: ७ राशींना यश, शेअर मार्केटमधून नफा; नोकरीत प्रगती, लाभाचा उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:11 AM2024-06-20T11:11:11+5:302024-06-20T11:11:11+5:30

राहु कोणत्या नक्षत्रात गोचर करणार आहे? कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? कसा लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांमधील सर्वच ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात, तसेच ते नियमित अंतराने एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करत असतात. नवग्रहातील छाया ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु अनुक्रमे आताच्या घडीला मीन आणि कन्या राशीत आहेत. राहु आणि केतु यांमधील राहु हा ग्रह लवकरच नक्षत्र गोचर करणार आहे.

राहु ग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहे. ०८ जुलै रोजी राहुचे नक्षत्र गोचर होणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. तर या नक्षत्राचे देवता गुरु आहे. गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचे संबंध असल्याचे मानले जाते. रेवती नक्षत्रातून राहु उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात गोचर करणार आहे.

काही मान्यतांनुसार, शनी आणि राहु यांचे संबंध फारसे चांगले मानले जात नाही. परंतु, राहुच्या नक्षत्र गोचराचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. करिअर, नोकरी, आर्थिक आघाडीवर राहु नक्षत्र गोचराचा कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: राहुचे नक्षत्र गोचर करिअरसाठी लाभदायक ठरू शकेल. हुशारी आणि मुत्सद्देगिरीचा अवलंब करून शत्रूंना पराभूत करू शकाल. व्यवसायात नवीन काही करण्याचा विचार करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. यशस्वी होऊ शकाल.

वृषभ: फायदा होऊ शकेल. राहुचा नक्षत्र बदल शुभ ठरू शकेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकेल. शेअर मार्केटमधून लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याची शक्यता आहे.

मिथुन: कामाच्या ठिकाणी बॉसशी चांगले संबंध ठेवण्यावर भर द्यावा. व्यवस्थापन क्षमता सुधारू शकेल. नेतृत्वाची गुणवत्ता वाढेल. ऑफिसमधील लोक बोलण्याकडे लक्ष देऊ लागतील. नोकरीमध्ये बदली मिळविण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर फायदा होऊ शकेल.

सिंह: जीवनातील अनेक आघाड्यांवर यश, प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या भागीदारीत काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर चांगले परिणाम मिळतील. घरातील वातावरण शांततेने भरलेले असेल.

तूळ: राहुचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. नशिबाची पूर्ण साथ लाभू शकेल. परदेशी व्यापारातूनही भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूंचा पराभव होऊ शकेल. नोकरदारांना मोठ्या जबाबदारीसह पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा होऊ शकेल.

वृश्चिक: राहु आणि शनी दोघांची स्थिती चांगली मानली जाते. अशा स्थितीत राहुचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊन रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक बाबतीत हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याबाबत थोडे सावध राहावे.

मकर: यश मिळण्याची शक्यता आहे. भाग्यवान सिद्ध होऊ शकेल. करिअरबाबत काही धाडसी निर्णय घेऊ शकता. हा निर्णय भविष्यात योग्य ठरू शकेल. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काळ चांगला आहे. उत्कृष्ट परतावा मिळण्याची शक्यता आहे. बॉसशी चांगले संबंध ठेवण्याचा थेट फायदा होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.