सूर्याचे २ अत्यंत शुभ राजयोग: ५ राशीं मालामाल, सूर्यकृपेने सुख-समृद्धी; ऑगस्टमध्ये लाभच लाभ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 01:21 PM 2023-07-29T13:21:59+5:30 2023-07-29T13:30:41+5:30
दुर्लभ, दुर्मिळ पण अत्यंत शुभ मानला गेलेला सूर्याचा वासी नामक राजयोग जुळून येत आहे. दुसरा राजयोग कोणता? जाणून घ्या... अधिक महिना सुरू आहे. वास्तविक अधिक महिन्यात सूर्याचे राशीपरिवर्तन होत नाही. मात्र, यंदा अधिक महिन्याच्या पूर्वसंध्येला सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला. त्यानंतर आता अधिक महिन्याची सांगता झाल्यावर सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह ही सूर्याचे स्वामित्व असलेली रास आहे. सूर्य स्वराशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होत असताना अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ मानला गेलेला वासी नामक राजयोग जुळून येत आहे.
१६ ऑगस्ट रोजी सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध सिंह राशीत असल्यामुळे सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. याशिवाय सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असताना चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही चंद्राचे स्वामित्व असलेली रास आहे.
सूर्याच्या सिंह राशीतील संक्रमणाला सिंह संक्राती म्हटले जाते. सिंह संक्रांतीवेळी शुक्र ग्रह वक्री चलनाने कर्क राशीत विराजमान असेल. त्यामुळे चंद्र, शुक्र आणि सूर्याच्या या योगांचा वासी नामक राजयोग जुळून येत आहे. सूर्याच्या सिंह संक्रांतीमध्ये बुधादित्य आणि वासी असे दोन राजयोग जुळून येत आहेत.
सिंह राशीत सूर्याच्या संक्रमणाच्या वेळी चंद्र आणि मंगळाचा संयोगही असेल. यामुळे चंद्र योग जुळून येईल. या ग्रहमानामुळे काही राशीच्या व्यक्तींना ऑगस्टचा महिना लाभदायक, शुभ परिणामकारक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. करिअर, आर्थिक आघाडीवर कसा ठरू शकेल राजयोग, ते जाणून घेऊया...
मेष राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग उत्तम फलदायी ठरू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. धार्मिक कार्यात अधिक सहभागी व्हाल. तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी आगामी काळ सर्वोत्तम ठरू शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग लाभदायी ठरू शकेल. एक वेगळा आत्मविश्वास मिळेल. व्यक्तिमत्त्वही चांगले असेल. सुधारणा दिसेल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्न वाढू शकेल. कौटुंबिक जीवनात प्रगती होईल. कोणाशी तरी भागीदारी करून व्यवसाय करणाऱ्यांना या काळात लाभ होईल.
तूळ राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग उत्तम फलदायी ठरू शकेल. धनलाभ होईल. दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होईल. ज्या लोकांकडे सरकारी क्षेत्राशी संबंधित कोणतेही काम आहे, त्यांना यश मिळू शकेल. मित्रांकडून आर्थिक लाभही मिळतील. नोकरीच्या ठिकाणीही सन्मान मिळेल. लाभ होईल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील. मोठ्या भावाच्या मदतीने लाभ मिळतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग सकारात्मक ठरू शकेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थितीही चांगली होणार आहे. या काळात काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आयुष्यात आनंद येईल. संपत्ती वाढवण्याच्या चांगल्या नवीन संधी मिळतील.
धनु राशीच्या व्यक्तींना वासी नामक राजयोग लाभदायी ठरू शकेल. जे काही प्रयत्न कराल ते यशस्वी होतील. एकामागून एक यशाचा टप्पा गाठल्याचा आनंद मिळेल. खूप भाग्यवान असणार आहात. अनेक फायदे मिळतील. तब्येतही चांगली राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.