बुध वक्री: ६ राशींना फायदा, नववर्षांत अनेक लाभ; व्यापारात नफा, करिअर-नोकरीत यश-प्रगती! By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 05:16 PM 2023-12-22T17:16:13+5:30 2023-12-22T17:22:32+5:30
डिसेंबरची सांगता होताना होणारे बुधाचे गोचर ६ राशींना नववर्षाची सुरुवात दमदार करणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आताच्या घडीला धनु राशीत वक्री आहे. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य धनु राशीत असून, या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य नामक राजयोग जुळून येत आहे. डिसेंबर महिन्याची सांगता होताना बुध वक्री चलनाने वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
२८ डिसेंबर रोजी बुध वक्री चलनाने वृश्चिक राशीत विराजमान होणार असून, २४ डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणाऱ्या शुक्र ग्रहाशी युती होऊन लक्ष्मी नारायण नामक अतिशय शुभ योग जुळून येणार आहे. बुध हा नोकरी आणि व्यवसायाचा कारक ग्रह असून, बुध राशीपरिवर्तन करतो, तेव्हा त्याचा परिणाम करिअर, अर्थव्यवस्था, देश-दुनियेसह सर्व १२ राशींवर होतो, असे सांगितले जाते.
बुधाचे वृश्चिक राशीत होणारे गोचर आणि शुक्र ग्रहाशी होत असलेली युती ६ राशींसाठी नववर्षाची सुरुवात दमदार करणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आर्थिक आघाडी, करिअर, नोकरी, व्यवसायात चांगले लाभ मिळू शकतील, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
वृषभ: नवीन वर्षात करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग तयार होतील. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. संवाद सुधारेल, ज्यामुळे काम इतरांकडून करून घेण्यात यशस्वी होऊ शकाल. एकाग्रता वाढू शकेल. जोडीदारासोबत मिळून मालमत्ता किंवा संपत्ती वाढवू शकता.
कर्क: नवीन उत्साह येईल. बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढेल. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. यशस्वी व्हाल. कोणतेही काम करण्यास मागे हटणार नाही. आगामी काळ खास असणार आहे. भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर चांगला नफा मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह: करिअरमध्ये सुधारणा होऊ शकेल. शिकण्याची क्षमता वाढेल. लोक बोलण्याने प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी फायदा मिळू शकेल. कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. आगामी वर्ष करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल. वडिलांसोबत संबंध चांगले राहतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. शेअर बाजारात कोणताही पैसा गुंतवला असेल तर फायदे मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
कन्या: आगामी काळ लाभदायक ठरणार आहे. व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल. नवीन वर्षाचा पहिला महिना नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होईल. ध्येयाकडे वाटचाल करत राहतील. जोडीदाराच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थितीही सुधारेल. विचारांची प्रशंसा होईल. लोकांशी तुमचा संवाद खूप प्रभावी होईल.
तूळ: बुध गोचर चांगले राहणार आहे. व्यावसायिक जीवनात अनेक सुधारणा होतील. करिअर पुढे जाईल. कौशल्यात चांगली सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. प्रभाव वाढेल. व्यावसायिक जीवनात कोणतीही समस्या येत असेल, तर ती या काळात सोडवली जाऊ शकते. व्यावसायिकांनी केलेल्या योजनांचे फायदे दिसून येतील. परिस्थिती सुधारेल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील.
धनु: करिअरच्या दृष्टीने अनुकूल काळ असणार आहे. प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिक जीवनात अनेक नवीन संधी मिळतील. प्रभावशाली लोकांची भेट होईल. भविष्यात चांगले लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य राहील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळेल. नफा कमावण्याची, बचत करण्याची संधी मिळेल.
बुध धनु राशीत वक्री असताना मंगळ ग्रह प्रवेश करणार आहे. यामुळे आदित्य मंगल आणि त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.