५५ दिवस ५ राशींना वरदान काळ: नक्षत्र गोचर पुण्य फलदायी, अपार लाभ; वक्री शनी-राहु शुभ करतील! By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:48 AM 2023-08-23T10:48:07+5:30 2023-08-23T10:54:12+5:30
राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील वक्री शनीचे गोचर ५ राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी देव कुंभ राशीत वक्री आहे. शनी वक्री अवस्थेत शततारका नक्षत्रात प्रवेश करत आहे. पुढील ५६ दिवस शततारका नक्षत्रात शनी वक्री राहील. वक्री शनीचे शततारका नक्षत्र गोचर काही राशीच्या लोकांच्या करिअर आणि वैयक्तिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम देईल, असे म्हटले जात आहे.
ज्योतिषशास्त्रात शनी हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा जेव्हा शनी गोचर करतो, तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनी ग्रह शततारका नक्षत्राच्या पहिल्या चरणात वक्री अवस्थेत गोचर करेल. १५ ऑक्टोबरपर्यंत शनी शततारका नक्षत्रात वक्री अवस्थेत राहणार आहे. वक्री शनी ५ राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, असे सांगितले जात आहे.
शततारका नक्षत्राचा स्वामी राहु आहे. शनीचे राहुचे स्वामित्व असलेल्या शततारका नक्षत्रातील गोचर महत्त्वाचे मानले गेले आहे. शनी आताच्या घडीला स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान असून वक्री आहे. शनीच्या शततारका गोचरामुळे ज्योतिषशास्त्रात छाया, क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहुशी प्रतिकूल योग जुळून येत आहे. आताच्या घडीला राहु मेष राशीत वक्री चलनाने विराजमान आहे.
वक्री शनीचा शततारका नक्षत्रातील गोचर ५ राशींसाठी अतिशय अनुकूल मानले जात आहे. आर्थिक आघाडी, करिअर, कुटुंब, नोकरी, व्यापार-व्यवसाय अशा अनेकविध क्षेत्रांवर याचा प्रभाव पडू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर शनी कृपा असेल? कोणत्या भाग्यवान राशींना अपार लाभ मिळू शकतील? जाणून घ्या...
मेष राशीच्या व्यक्तींना वक्री शनीचे नक्षत्र गोचर उत्तम फलदायी ठरू शकेल. या काळात नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर चांगले फायदे मिळतील. शनी व्यावसायिकांनाही लाभ देईल. नोकरदार लोकांवरही शनीची विशेष कृपा राहणार आहे. पुढे जाण्याच्या अधिक संधी मिळू शकतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींना वक्री शनीचे नक्षत्र गोचर विशेष लाभदायी ठरू शकेल. या काळात शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्ही केलेले सर्व प्रवास यशस्वी होऊ शकतील. मोठा फायदा होईल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळू शकेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना वक्री शनीचे नक्षत्र गोचर सकारात्मक ठरू शकेल. करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना यश मिळेल. ज्या कामाचा खूप दिवसांपासून विचार करत होता ते काम आता पूर्ण होऊ शकेल. यासोबतच शनिदेवाच्या कृपेने भरपूर धनप्राप्ती होऊ शकेल.
तूळ राशीच्या व्यक्तींना वक्री शनीचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकेल. या काळात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल. भरीव रक्कम मिळू शकते. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ खूप फलदायी असणार आहे. यासोबतच मेहनतीचे पूर्ण फळही मिळू शकेल.
धनु राशीच्या व्यक्तींना वक्री शनीचे नक्षत्र गोचर प्रगतीकारक ठरू शकेल. नोकरदारांना यश मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीच्या शोधात यश मिळेल. नोकरीत असलेल्यांना त्यांच्या बॉसकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. ज्यामुळे तुमची प्रमोशन होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.