संकष्ट चतुर्थी: ५ राशींवर बाप्पाची कृपा, धनलाभ योग; महादेव होतील प्रसन्न, समसप्तक करेल शुभ! By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 07:00 AM 2024-01-29T07:00:07+5:30 2024-01-29T07:00:07+5:30
Sankashti Chaturthi January 2024: सोमवारी आलेली संकष्ट चतुर्थी ५ राशींना शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी २९ जानेवारी रोजी आहे. पौष महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने शुभ फलदायी ठरणारी आहे. देशातील लाखो गणेशभक्त या दिवशी उपवास करून गणेशाची उपासना, आराधना, पूजन करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च मानले जाते.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास सोमवार हा महादेव तसेच चंद्राला समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत असून, नंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शनी आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्याने समसप्तक योग जुळून येत आहे. याशिवाय शोभन योग आणि पूर्वा नक्षत्र असेल. यामुळे संकष्ट चतुर्थीचे महत्त्व वाढल्याचे बोलले जात आहे.
संकष्ट चतुर्थीला जुळून येत असलेल्या शुभ योगांचा ५ राशींना फायदा होऊ शकेल. या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात सुधारेल. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी मिळतील. काही ज्योतिषशास्त्रीय उपायही सांगण्यात आले आहेत, या उपायांनी कुंडलीतील चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळू शकेल. जाणून घ्या...
मिथुन राशीच्या व्यक्तींना संकष्ट चतुर्थी शुभ ठरू शकेल. देवावरील अतूट श्रद्धा वाढू शकेल. महादेवाच्या कृपेने अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा कमविण्यासाठी नवीन डावपेच आखू शकाल. घरातील वडीलधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. हा दिवस व्यापारी वर्गाच्या तुलनेत नोकरदार लोकांसाठी अधिक आनंददायी असेल; विश्रांतीसोबतच मनोरंजनाची संधी मिळू शकेल. सहज बचत करू शकाल. ५ बेलच्या पानांवर पांढऱ्या चंदनाचे तिलक लावून शिवलिंगावर अर्पण करावे. शिवाष्टकांचे पठण किंवा श्रवण करावे.
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. धार्मिक कार्यात रस घेतील. मानसिक शांती मिळेल. नोकरदारांना अनेक चांगल्या संधी देखील मिळू शकतात. व्यवसायात काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. परंतु बुद्धीने सर्व समस्यांवर मात कराल. चांगला नफा मिळू शकेल. ज्यामुळे व्यवसायाची विश्वासार्हता वाढेल. आईच्या सहकार्याचा फायदा होईल. संकष्ट चतुर्थीसह सोमवारचे विशेष व्रत करावे. शक्य असेल तर सकाळी, सायंकाळी शिवमंदिरात रुद्राक्ष जपमाळ घेऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
कन्या राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. परदेशी प्रवासाच्या बाबतीत नशिबाची साथ लाभेल. धाडसात आणि शौर्यामध्ये चांगली वाढ होईल. अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा वाढेल. उच्च स्तरावर पैसे कमविण्यात यशस्वी होतील. बचत होऊ शकेल. व्यावसायिक सौद्यांमध्ये नफा मिळविण्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना तगडे आव्हान द्याल. नवीन व्यावसायिक संबं निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून खूप काही शिकायला मिळेल. मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. काम नवीन दिशेने घेऊन जाल. शक्य असेल तर शिवचालिसाचा पठण किंवा श्रवण करावी.
मकर राशीच्या व्यक्तींना खास दिवस असणार आहे. उणिवांवर मात करण्याचा प्रयत्न करतील. करिअर मजबूत करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातून काहीतरी शिकण्याची इच्छा वाढेल. व्यवसायात अधिक नफा मिळवण्याच्या स्थितीत येऊ शकाल. उच्च नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत नाते घट्ट होईल. एकत्र एखाद्या नातेवाईक ठिकाणी जाऊ शकता, जिथे खूप आदर केला जाईल. महादेवाच्या कृपेने काही प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल. मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी विशेष व्रताचरण करावे.
मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूलता येऊ शकेल. आनंदात वाढ होईल. घरातील कामामुळे खुश दिसतील. पालकांच्या आशीर्वादाने एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता. चांगला नफा मिळेल. काही धार्मिक कार्यक्रमही आयोजित करू शकता. नोकरदारांच्या जीवनात चांगली प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतील. समाधान मिळेल. व्यवसायातील अडचणींवर मात करू शकाल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळतील. गणपती बाप्पा आणि महादेवांची उपासना, आराधना करावी.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.