Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्रीला 'हे' चार पदार्थ खाणे पडू शकते महाग; पितृदोषातून होणार नाही सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:11 PM2024-10-01T15:11:23+5:302024-10-01T15:16:21+5:30

Sarva Pitru Amavasya 2024: २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आहे. त्यादिवशी पितृ पक्षाचा शेवटही आहे. ज्यांना पितृपक्षात (Pitru Paksha 2024) श्राद्धविधी करता आले नाहीत, त्यांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करून पितृ दोषातून मुक्त व्हावे आणि पितरांनाही मुक्त करावे. ज्यांना श्राद्ध विधी करणे शक्य नाही त्यांनी पितरांच्या नावे दानधर्म करावा, पितरांना नैवेद्य दाखवावा, कावळ्याप्रमाणे माशांनाही खाऊ घालावे, परंतु काही ना काही कृती अवश्य करावी. त्याबरोबरच सर्व पित्रीच्या दिवशी घ्यावी विशेष काळजी!

यंदा सर्वपित्री अमावस्येलाच सूर्य ग्रहण देखील आहे. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण काळात नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढते. तसेच पितृपक्षाचा एकूणच काळ हा मनावर मळभ आणणारा असल्यामुळे ज्योतिष शास्त्राने काही गोष्टींच्या बाबतीत प्रखर विरोध करा असे सांगितले आहे.

सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षातील महत्त्वाचा दिवस मानला जातो, त्यादिवशी अनेक जण आपल्यावरचे अरिष्ट टळावे म्हणून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी चक्क मिठाई दान करतात किंवा कोणाला खाऊ घालतात. मात्र त्यामागील भाव शुद्ध नसल्याने त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, वास्तूवर, कुटुंबातील सदस्यांवर होऊ शकतो, म्हणून या दिवशी विश्वासातील लोक वगळता कोणाकडूनही मिठाईचा स्वीकार करू नका.

जेवणानंतर अनेकांना विडा खाण्याची सवय असते. ही सवय चांगली आहे, परंतु कोणी तुम्हाला विडा देऊ केला तर निदान अमावस्येच्या तिथीला स्पष्ट नकार द्या. स्वतः बनवलेला किंवा विकत घेतलेला विडा खा, पण कोणाकडून दिलेला विडा खाऊ नका. शारीरिक, मानसिक अपाय होऊ शकतो.

पूर्वीच्या काळी परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे जेवण टाळले जात असे, मात्र आता आपण उठ सूट एकमेकांकडे जातो, खातो, चहा-कॉफी पितो. धर्मशास्त्र सांगते, अमावस्येच्या रात्री सूर्य ग्रहणामुळे वातावरणात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे शक्यतो या कालावधीत कोणाकडे जाणे टाळा, किंवा कोणाच्या घरचे खाणे टाळा. कोण कोणत्या भावनेने काय देईल याचा आपल्याला अंदाज नसतो, म्हणून अमावस्येला तरी परान्न टाळाच!

अमावस्या आणि पौर्णिमा या लक्ष्मी मातेच्या आवडत्या तिथी आहेत. अनेक जण या तिथीला मांसाहार टाळतात. परंतु दुसऱ्या दिवसापासून नवरात्र (Navratri 2024) सुरु होत असल्याने कोणी आदल्या रात्री मांसाहार करण्याचा विचार करत असेल तर तुम्ही चुकताय, हे लक्षात घ्या. अमावस्येला मांसाहार प्रकर्षाने टाळा. जमल्यास या गोष्टी दर अमावस्येला फॉलो करा.