१२ जुलैला शनी वक्री: मकर प्रवेशाने ‘या’ राशींची साडेसाती होणार सुरु; तुमची रास कोणती? पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:56 AM 2022-07-09T09:56:45+5:30 2022-07-09T10:02:32+5:30
Saturn Retrograde in Capricorn 2022: शनी वक्री चलनानने साडेसातीचे चक्र बदलणार असून, ८ राशीच्या व्यक्तींना मकर राशीतील गोचर वरदानापेक्षा कमी ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह नियमित कालावधीत ब्रह्मांडात भ्रमण करत असतात. ज्योतिषशास्त्रात न्याय आणि कर्माचा देव मानला जाणारा शनी १२ जुलै रोजी वक्री चलनाने स्वराशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर ७ जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. (saturn retrograde in capricorn 2022)
ज्योतिषशास्त्रानुसार, आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींची साडेसाती सुरू आहे. मात्र, शनीने वक्री मार्गाने मकर राशीत प्रवेश केला की, आगामी काही काळासाठी धनु राशीवर साडेसातीचा प्रभाव दिसून येऊ शकेल आणि मीन राशीवरील साडेसातीचा प्रभाव अत्यल्प प्रमाणात दिसून येऊ शकेल. तर, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनीची ढिय्या सुरू होईल. (shani vakri in makar rashi 2022)
शनी वक्री आहे, तोपर्यंत मंगळाचे स्वामित्व असलेल्या धनिष्ठा नक्षत्रात असेल. त्यामुळे शनी मंगळ अंगारक योग तयार करतो. मात्र, सर्वच राशीवर याचा परिणाम दिसून येऊ शकेल. काही राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे शुभ ठरू शकेल, जाणून घेऊया... (saturn retrograde 2022 astrology shani vakri)
मेष राशीच्या लोकांसाठी शनी वक्री होणे फायदेशीर ठरू शकते. हा काळ खूप खास असू शकेल. तुमची सर्व प्रलंबित तातडीची कामे या दरम्यान पूर्ण होतील. कामात येणारे अडथळेही दूर होतील. जुन्या चिंता दूर होतील आणि आजारांपासून आराम मिळेल. प्रॉपर्टीच्या कामातही तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी, व्यवसायातही लाभदायक काळ ठरू शकेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनी वक्री होणे अतिशय नेत्रदीपक ठरू शकेल. नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते, तुम्ही जे काम सोडले होते ते पुन्हा सुरू करू शकता. लाभ मिळतील. असा प्रवास होऊ शकतो ज्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. अवाजवी खर्च टाळा. भगवान शिवाची आराधना करा, तुम्हाला खूप लाभ होतील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे वक्री होणे लाभदायक ठरू शकते. जीवनात नवीन गोष्टींचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या जातील, त्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. दूरचा प्रवास करावा लागू शकतो. या प्रवासात तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या मालमत्तेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करू शकाल.
कर्क राशीच्या लोकांसाठी शनी वक्री होणे यशकारक ठरू शकेल. नोकरीत पदोन्नतीचे योग जुळून येऊ शकतात. मात्र, तुम्हाला उत्पन्न कमी आणि खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तुमचे राहणीमान सुधारेल आणि व्यावसायिक बाबतीत तुमच्यासाठी शुभ योग बनत आहेत. या काळात तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमचा नफाही वाढू शकतो.
सिंह राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. परदेशाशी संबंधित कामे होऊ शकतील. वैवाहिक जीवनात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या लहान भावांची काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. काही प्रमाणात परिस्थिती अनुकूल राहणार नाही. खर्चही जास्त होऊ शकतो, मेहनत करावी लागेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. शिक्षणात यश मिळेल. परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. शहाणपणाने निर्णय घ्या. उत्पन्नात काही अडचण येऊ शकते, मित्रांवर अतिविश्वास ठेवू नका. सल्लामसलत करून गुंतवणूक करा. कुटुंबाशी मजबूत संबंध राहतील.
तूळ राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे आव्हानात्मक ठरू शकेल. घर, कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील. तुमच्या कामात काही अडचण येऊ शकते. महामृत्युंजय मंत्राचा जप करा. पैशाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या. कामात चूक होऊ शकते. भावंडांसोबतचे नाते जपा. शिवाची आराधना करा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नव्याने तयार केलेले धोरण प्रभावी ठरतील. अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कार्यक्षेत्राशी संबंधित निर्णय घाईघाईने घेऊ नका. आळसाची स्थिती राहील. प्रवासात कमी फायदा होऊ शकेल.
धनु राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे अनुकूल ठरू शकेल. या कालावधीत बोलण्यात गोडवा आणावा. कुटुंबाला आधार द्यावा. येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल. देवी गौरीची पूजा करा. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. मात्र, कठोर परिश्रम करावे लागतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत देत आहे. व्यवसाय आणि क्षेत्रात चांगला नफा आणि यश मिळण्याचीही शक्यता आहे.
मकर राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे लाभदायक ठरू शकेल. मान-सन्मानात वाढ होईल. अनेक स्त्रोतांकडून पैशाची आवक होईल. भावंडांचे सहकार्य आणि धैर्य वाढलेले दिसून येते. तुमची विचारसरणी चांगली असेल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात यश मिळेल, अडचणी कमी होतील.
कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी वक्री होणे संमिश्र ठरू शकेल. अनावश्यक धावपळ करावी लागू शकते. यावेळी तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. पैशाच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करण्यापूर्वी थोडा विचार करा.
मीन राशीच्या लोकांसाठी शनी लाभदायक स्थानात वक्री होणार आहे. या स्थानी शनीदेव सर्वांत जास्त प्रसन्न असतात, अशी मान्यता आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आगामी काळात आर्थिक स्थिती अतिशय नेत्रदीपक असू शकेल. गुप्त स्त्रोतांकडून पैसे मिळवण्यात यश मिळू शकेल.