१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य! By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:11 AM 2024-04-30T11:11:17+5:30 2024-04-30T11:21:52+5:30
शनी ग्रह स्वराशीत वक्री होणार आहे. याचा शुभ लाभदायक प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ०१ मे रोजी गुरु राशीपरिवर्तन करणार असून, हे यंदाचे मोठे राशीपरिवर्तन मानले जात आहे. यानंतर जून महिन्यात आणखी एक महत्त्वाचे परिवर्तन होणार आहे. ते म्हणजे शनी ग्रह कुंभ राशीत वक्री होणार आहे.
शनी ग्रह कुंभ राशीत ३० जून रोजी वक्री होणार आहे. शनीचे हे वक्री चलन सुमारे १३९ दिवस चालणार असल्याचे सांगितले जात आहे. शनी आपल्या मूलत्रिकोण राशीत असल्यामुळे शश नामक राजयोग आहे. यातच शनी वक्री होणे काही राशींना अत्यंत लाभदायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.
शनी वक्री होण्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडू शकतो. करिअर, कुटुंब, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आर्थिक आघाडीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
मेष: अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. बढती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. नवीन प्रकल्पांच्या कामात प्रगती होईल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. गुंतवणुकीचा फायदा होईल. शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.
वृषभ: शनीचे वक्री होणे वरदानापेक्षा कमी नाही. अपूर्ण काम पूर्ण होईल. अडचणीतून दिलासा मिळू शकेल. अचानक आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. नशिबाची साथ मिळू शकेल. नोकरीत बढती आणि पगार वाढण्याची चिन्हे आहेत. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन: शनी वक्री होणे अनुकूल सिद्ध होऊ शकते. नशिबाची साथ लाभू शकेल. करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. चांगले पैसे कमावू शकाल. बचत करू शकाल. अधिक मेहनत करावी लागेल. देश-विदेशात प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकतात.
वृश्चिक: शनीचे वक्री चलन वरदानापेक्षा कमी नाही. चांगला लाभ होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात यांमध्ये चांगली संधी प्राप्त होऊ शकते. उत्पन्न वाढल्याने बँक बॅलन्स वाढू शकेल. वैवाहिक आणि प्रेम जीवनात मधुर संबंध राहतील.
मकर: शनीचे वक्री चलन शुभ सिद्ध होऊ शकेल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. बोलण्यामुळे समोरचे लोक प्रभावित होऊ शकतात. व्यापारी, व्यवसायिकांना एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी किंवा कामासाठी कर्ज काढायचे असल्यास काळ अनुकूल ठरू शकेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.