Shani Amavasya 2025:२९ मार्च रोजी सूर्यग्रहणाचा 'या' राशींवर पडणार प्रभाव; १५ दिवस जरा जपूनच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:41 IST2025-03-28T12:36:39+5:302025-03-28T12:41:37+5:30

Shani Amavasya 2025: सूर्य सध्या मीन राशीत आहे आणि शनिही गोचर करून २९ मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनि आणि सूर्याचा संयोग फारसा चांगला मानला जात नाही, कारण वर्षातील पहिले सूर्यग्रहण(Solar Eclipse 2025) देखील २९ मार्च रोजी शनीच्या संक्रमणाच्या दिवशी होत आहे शिवाय या दिवशी शनि अमावस्यादेखील (Shani Amavasya 2025) आहे! त्यामुळे काही राशींना पुढचे पंधरा दिवस सावध राहावे लागेल.

३० वर्षांनंतर मीन राशीमध्ये शनि आणि सूर्याचा संयोग होत आहे. २९ मार्च रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल आणि सूर्य १४ एप्रिलपर्यंत मीन राशीत राहील. यामुळे सुमारे १५ दिवस सूर्य आणि शनीचा संयोग असेल, जो ५ राशीच्या लोकांसाठी तापदायक ठरू शकेल. या राशींनी पुढील काळात कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊ.

सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक बाबतीत त्रास होईल. मेष राशीच्या लोकांची साडेसाती २९ मार्च पासून सुरु होत आहे. त्यात या संयोगामुळे १४ एप्रिलपर्यंत निद्रानाश, पाय दुखणे, हाडांच्या समस्या जाणवू शकतात. या काळात शत्रूंपासून दूर राहा. एखादी अनामिक भीती तुम्हाला सतावेल, नामःस्मरण करत राहा आणि प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहा.

सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि शनि-सूर्य यांच्यात वैर आहे. या संयोगामुळे सिंह राशीच्या लोकांना त्रास होईल. तसेच सिंह राशीत शनि संक्रमणामुळे. धैय्याही सुरू होत आहेत. या काळात वेगवेगळे आजार तुम्हाला त्रास देतील. शत्रूंमुळे नुकसान होईल. प्रवासात अडचण येऊ शकते. वाईट सवयी टाळा, नाहीतर दुप्पट नुकसान होईल.

कन्या राशीच्या लोकांसाठी, सूर्य आणि शनीचा संयोग जीवनात संघर्ष निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. याकाळात विशेष काळजी घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच आरोग्याची काळजी घ्या.

धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा संयोग अशुभ परिणाम देईल. शनि गोचर होताच धनु राशीवर धैय्या सुरू होईल. शारीरिक वेदना सतावतील. . तणाव राहील. खर्च जास्त होतील, वेळेचे आणि पैशांचे नियोजन करा. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन राशीतच सूर्य आणि शनीचा संयोग होणार आहे. याशिवाय मीन राशीतही सूर्यग्रहण होत आहे. मीन राशीत शनि गोचरामुळे या लोकांसाठी साडे सातीचा दुसरा टप्पा सुरू होईल, जो अत्यंत क्लेशदायक मानला जातो. हा काळ आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास देईल. काळजीपूर्वक गुंतवणूक करा, कोणतीही जोखीम घेऊ नका. पुढील अडीच वर्षे प्रत्येक गोष्ट संयम ठेवून करा.