शनि गोचर-अमावस्या, सूर्यग्रहण: ९ राशींचा गोल्डन टाइम सुरू, अपार लाभ; वरदान काळ, चांगले घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:53 IST2025-03-21T14:41:31+5:302025-03-21T14:53:06+5:30
गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला शनि अमावास्या, शनि गोचर, सूर्य ग्रहण असून, अनेक राशींची नव्या वर्षाची सुरुवात अगदी दिमाखदार पद्धतीने होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

हिंदू नववर्ष सुरुवात होत आहे. ३० मार्च रोजी गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी फाल्गुन अमावास्येला अनेक अद्भूत योग जुळून येत आहे. फाल्गुन अमावास्या शनिवारी येत असल्यामुळे याला शनि अमावास्या असे म्हटले जाते. विशेष म्हणजे याच दिवशी शनि स्वराशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. पुढील सुमारे अडीच वर्ष शनि मीन राशीत असणार आहे.
आणखी एक विशेष योग या दिवशी आहे. शनि अमावास्येला शनि ग्रहाचा मीन राशीत प्रवेश होताना सूर्यग्रहण लागणार आहे. एकाच दिवशी शनि अमावास्या, शनि गोचर आणि सूर्य ग्रहण हा अतिशय विशेष योग मानला गेला आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शनि उदय होणार आहे. शनि मीन राशीत विराजमान झाल्यावर अनेक युती योग जुळून येणार आहे.
विद्यामान घडीला मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन ग्रह आहेत. या सर्वांशी शनिचा युती योग जुळून येणार आहे. तसेच कन्या राशीत असलेल्या केतुशी समसप्तक योग जुळून येणार आहे. शनिचा मीन राशीत प्रवेश होताच मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे. शनि अमावास्येला होत असलेले शनि गोचर आणि सूर्य ग्रहण काही राशींना सर्वोत्तम ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
वृषभ: व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना नवीन डील आणि मोठे क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. बराच काळ अडकलेले पैसे, उधारी परत मिळण्याची आशा आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती आणि सन्मानात वाढ होऊ शकेल. करिअर क्षेत्रात सुरू असलेल्या समस्या संपतील. पैशाच्या समस्या संपून आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. मोठे भाऊ आणि बहिणींशी असलेले नाते अधिक घट्ट होईल. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
मिथुन: कामात आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल. आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ असेल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता असेल. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी पाहायला मिळतील. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल. व्यापारी वर्ग नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकतो.
कर्क: कामात भाग्याची साथ मिळू शकते. तसेच या काळात देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. ज्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना नवीन डील आणि मोठे क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. वाद मिटविण्यासाठी हा काळ अनुकूल असेल.
सिंह: करिअरमध्ये तसेच वैयक्तिक आयुष्यात बरेच बदल दिसू शकतात. अपार यश मिळवू शकतात. व्यावसायिक जीवन खूप चांगले जाणार आहे. समाजात आदर आणि सन्मान झपाट्याने वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक परिस्थिती बरीच चांगली असणार आहे. आर्थिक लाभ मिळू शकतो. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. संयम आणि शिस्त पाळली तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता.
कन्या: हा काळ अनुकूल ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकेल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. आदर आणि सन्मान वेगाने वाढेल. नोकरी किंवा कंपनी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. व्यक्तिमत्व बळकट करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळू शकतो. व्यवसायात प्रतिस्पर्धी आणि विरोधकांशी सुरू असलेले मतभेद सोडवण्याचा प्रयत्न कराल. यामुळे व्यावसायिक जीवनात आदर वाढेल. स्थावर मालमत्तेतून भरपूर कमाई करू शकता. नवीन मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
तूळ: अनुकूल ठरू शकतो. करिअरमध्ये अपार यश मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. शनिदेवाच्या कृपेने एकाग्रता वेगाने वाढू शकते. मालमत्तेच्या प्रश्नांमुळे कुटुंबात सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो.
धनु: फायदेशीर ठरू शकतो. सुखसोयी आणि सुविधा वाढतील. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन व्यवसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. सासू आणि सासू-सासऱ्यांशीसंबंध चांगले राहतील.
कुंभ: शुभ आणि फलदायी ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. संवाद पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. ज्यामुळे लोक प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अनेक कामे पूर्ण कराल. इच्छा पूर्ण होतील.
मीन: शनी गोचर आणि सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकतात. याच राशीत शनि विराजमान होणार आहे. आत्मविश्वास वाढेल. समाजात आदर वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक शांतता लाभू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.