शनी-बुधाचा दृष्टी योग: ३ राशींना बक्कळ लाभ, अपार यश; ३ राशींना कठीण काळ, संमिश्र फल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:28 PM2024-11-12T14:28:58+5:302024-11-12T14:41:38+5:30

शनी आणि बुध यांचा दृष्टी योग जुळून येत असून, कोणत्या राशींना लाभ आणि कोणत्या राशींना संमिश्र काळ ठरू शकतो? जाणून घ्या...

नोव्हेंबर महिना सुरू आहे. कार्तिकी एकादशीनंतर आता वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत आहे. या आगामी काळात अनेकविध योग जुळून येत आहेत. बुध आणि शनी यांचा एक दृष्टी योग जुळून येत आहेत.

१२ नोव्हेंबर २०२४ रोजी बुध आणि शनी यांचा हा योग जुळून येत आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांवर समकोणीय योग दृष्टी ठेवून असल्याचे सांगितले जात आहे. विद्यमान घडीला शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे.

तर बुध ग्रह वृश्चिक राशीत आहे. शनी आणि बुध यांचा हा दृष्टी योग काही राशींना शुभ लाभदायक ठरू शकेल. तर काही राशींना हा काळ खडतर, संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: अडचणी वाढू शकतात. मुलांना अभ्यासात रस राहणार नाही, त्यामुळे त्यांना शिक्षक आणि वडिलांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. नोकरदार लोकांना त्रास होऊ शकतो. जे मीडिया, आरोग्य किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत घसरण होण्याची शक्यता आहे. नोकरीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

मिथुन: उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. व्यावसायिकांचे प्रवास फायदेशीर ठरू शकतील. नवीन व्यावसायिक करार आणि आर्थिक स्थिती मजबूत करतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कामात नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. देश-विदेशात फिरू शकता. व्यवसाय, नोकरीत उत्तम लाभ होईल. धैर्य आणि शौर्य वाढू शकेल.

तूळ: नोकरी करणारे लोक प्रमोशन न मिळाल्याने चिंतेत राहतील. व्यवसाय बैठक अयशस्वी होऊ शकेल. विवाहित लोकांचे वर्तन चिडचिडे होऊ शकेल. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. वृद्धांना आरोग्याच्या तक्रारी सतावू शकतात. त्रास होऊ शकतो.

वृश्चिक: आगामी काळ फायदेशीर ठरू शकतो. या काळात आत्मविश्वास वाढेल. जीवनात यश मिळेल. कौटुंबिक संबंध मधुर होतील. विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जोडीदाराशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. एकमेकांना चांगले समजून घ्याल.

मकर: हा काळा लाभदायक सिद्ध होऊ शकते. प्रलंबित पैसे मिळतील किंवा अचानक पैसे मिळण्याचा योग जुळून येऊ शकतो. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरीत वाढीसह पदोन्नतीची संधी मिळू शकेल. बॉस खुश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. या काळात पैसे वाचवू शकता.

कुंभ: मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. नोकरदारांसाठी कार्यालयातील परिस्थिती अनुकूल असेलच असे नाही. आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित लोकांचे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. नवीन करार पूर्ण न झाल्यामुळे व्यावसायिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कोणाशीही भांडण करणे टाळावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.