शनिदेव बनवत आहेत महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब चमकवणार, मिळेल छप्परफाड पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 01:30 PM2022-09-14T13:30:41+5:302022-09-14T13:36:19+5:30

Shani Margi 2022 Rajyog: सध्या शनि आपलीच राशी असलेल्या मकरेत वक्री आहेत आणि 23 ऑक्टोबरपासून मार्गस्त होत आहेत.

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. कारण शनिदेव हे न्यायाची देवता म्हणून ओळखले जातात. शनिदेव हे कर्मानुसार फळ देतात आणि क्षणात एखाद्याचे भाग्य बदलतात. शनि हे राजाला रंक आणि रंकाला राजाही बनवतात. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनीच्या स्थितीत काही महत्त्वापूर्ण बदल होत आहेत.

सध्या शनि आपलीच राशी असलेल्या मकरेत वक्री आहेत आणि 23 ऑक्टोबरपासून मार्गस्त होत आहेत. शनीचे हे परिवर्तवन 3 राशींमध्ये पंच महापुरुष राजयोग बनवेल. हा योग अत्यंत शूभ मानला जातो. या महापुरुष राज योगामुळे या राशीच्या लोकांना छप्परफाड पैसा मिळेल आणि त्यांची प्रगतीही होईल.

मेष (Aries) - शनिदेव मकर राशीतून मार्गी होत असल्याने मेष राशीत पंच महापुरुष राज योग तयार होईल. यामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते अथवा सध्या असलेल्या नोकरीतच पदोन्नतीही मिळू शकते. याशिवाय या राशीच्या लोकांना व्यवसायात छप्परफाड नफा होईल. एखादे नवे कामही सुरू करू शकता. लोक आपल्या कामाने प्रभावित होतील.

धनु (Sagittarius): मार्गी शनी धनु राशीच्या लोकांनाही अत्यंत शुभ फळ देईल. आपण आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची वाट बघत होतात, आता ते प्रमोशनही मिळू शकते. पगार वाढेल. अडकलेला पैसा परत मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. नफा वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल.

मीन (Pisces) - ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना शनिची सरळ चाल मोठा फायदा देईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्याने मोठा दिलासा मिळेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्कांमुळे व्यवसाय वाढण्यास मदत मिळेल. कार-मालमत्ता खरेदीची दाट शक्यता.