Shani Gochar 2022: तीस वर्षांनंतर 'कुंभ'राशीमध्ये शनिदेव येणार,उघडणार 'या' राशींचे भाग्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:30 AM2022-04-13T11:30:36+5:302022-04-13T11:36:30+5:30

Shani Gochar 2022: ज्योतिष शास्त्रानुसार ३० वर्षांनंतर शनिदेव स्वतःच्या उप राशीत अर्थात कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनीचे हे राशी परिवर्तन २९ एप्रिल रोजी होणार आहे. या राशीबदलाचा अन्य तीन राशींना फार मोठा होणार असल्याचे दिसते. त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊ.

ज्योतिष शास्त्रानुसार मागच्या अडीच वर्षांनंतर शनिदेव आता एक अद्भुत योगायोग घडवणार आहेत. कर्म दाता शनिदेव २९ एप्रिल रोजी आपली राशी बदलणार आहेत. जवळपास ३० वर्षांनंतर शनिदेव प्रत्येक राशीचा फेरा पूर्ण करत मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याचे पडसाद अन्य राशींसाठी उपयुक्त कसे ठरतील ते पाहू.

शनीचा हा राशी बदल (शनि राशी परिवर्तन 2022) शनीचा प्रभाव असलेल्या सर्व राशींसाठी खास असणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे (शनि गोचर 2022) काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनिदेवाच्या कृपेने धन, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धी प्राप्त करून देईल. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असेल.

शनीचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांचे नशीब बदलेल आणि त्यांना जीवनात भरपूर संपत्ती मिळेल आणि प्रगती होईल. नोकरी-व्यवसायातही तुम्ही उत्तुंग यश मिळवू शकता. नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

शनीच्या या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल. ज्यांना शनिदेवाच्या प्रकोपामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. यासोबतच आर्थिक विवंचनाही दूर होतील आणि पैसा जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल. तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.

शनीचे हे संक्रमण कन्या राशीसाठी भाग्यवर्धक सिद्ध होईल. संक्रमण काळात आर्थिकदृष्ट्या मजबूत असण्यासोबतच तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाही मिळेल. विविध क्षेत्रांतून भरपूर धनलाभ होईल. याशिवाय नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होतील. शनिदेवाच्या कृपेने नशिबाचीही साथ मिळेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे.