Shani Gochar 2022: शनिदेवाचा मकर राशीत प्रवेश, पुढील ६ महिने या ६ राशींवर करतील आनंदाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 03:08 PM2022-07-23T15:08:52+5:302022-07-23T15:17:05+5:30

Shani Astrology 2022: न्यायदेवता शनी महाराज, पक्षपात न करता जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतात. त्यांच्या लेखी आपपरभाव नाहीच. त्यामुळे ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ, हा शनी देवांचा न्याय आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यात शनी देव पुढील राशींवर आनंदाचा वर्षाव करतील. त्यास कारणीभूत ठरणार आहे, शनी गोचर अर्थात शनी भ्रमण!

ज्योतिषांच्या मते, १२ जुलै रोजी शनिदेवाने मकर राशीत प्रवेश केला आहे. ते आता पुढील ६ महिन्यांसाठी या राशीत फिरतील. पूर्वी ते एप्रिल ते जुलै या काळात स्वतःच्या कुंभ राशीत होते. आता ते आपल्या स्वगृही अर्थात मकर राशीत आले आहेत. त्यामुळे मकर राशीसहीत अन्य पाच राशींच्या भाग्याचा प्रवास सुरू झाला आहे. व पुढील सहा महिने तो सुरू राहणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या ६ भाग्यशाली राशी, ज्यावर पुढील ६ महिने शनिदेवाच्या कृपेचा वर्षाव होणार आहे...

मकर राशीतील शनिदेवाचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. या राशीचे लोक पुढील ६ महिन्यांत कोणतेही नवीन काम सुरू करू शकतात. त्यांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. ते कुटुंबासह बाहेर फिरायलाही जाऊ शकतात. त्यांच्या घरात अचानक कुठूनतरी पैशाची आवक वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहील. पुढचा काळ शुभ आहे.

शनी देवाचा मकर राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी शुभ ठरेल. घरातील आजारपण दूर होईल. नवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून बघाल. जमा खर्च यांचा नीट हिशोब ठेवून गुंतवणूक केलीत तर भविष्यात त्याचा पुष्कळ लाभ होईल. प्रयत्नात कुचराई नको. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. शनी देव नक्की आशीर्वाद देतील.

या राशीच्या लोकांसाठी पुढील ६ महिने चांगले जाणार आहेत. त्यांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळू शकते. आजवर कोणी उसने घेतलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. नवीन क्षेत्रात गुंतवणूक करू शकता. मुलांच्या शिक्षणाच्या तक्रारी दूर होऊन निश्चिन्त व्हाल. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहील. फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा आयुष्यात गडबड होऊ शकते.

शनी देव स्वगृही येत आहेत. मकर ही शनी देवाची प्रिय रास. त्यामुळे पुढील सहा महिने स्वगृही राहून शनिदेव मकर राशीच्या जातकाची परीक्षा घेतील. मदत, सहकार्य, दानधर्म, ऊपासना आणि ज्येठांची सेवा इ गोष्टी शनीदेवाला प्रिय असल्यामुळे ते नक्की सहकार्य करतील. घराचे वातावरण आनंदी राहील आणि करिअर मध्ये झपाट्याने प्रगती होईल!

कुंभ राशीसाठी साडेसातीचा हा मध्य काळ सुरू आहे. या काळात त्यांनी शनी स्तोत्र, हनुमान स्तोत्र यांचे पठण करावे. उपासना करावी. राग टाळावा. घरच्यांचे मन राखले तर त्यांचेही प्रेम मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. विवाहेच्छुक मुला मुलींचे लग्न ठरेल, होईल.

शनिदेवाच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. ते नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात आणि फायदेशीर व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. यादरम्यान त्यांच्या उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होतील. या राशीच्या लोकांनी आपल्या अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. न्यायालयीन खटल्यांमध्येही यश मिळेल.