राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:13 PM2024-10-04T12:13:56+5:302024-10-04T12:21:50+5:30

शनी आणि राहु दोन महत्त्वाचे ग्रह असून, नक्षत्रातील गोचर कोणत्या राशींना अनुकूल सकारात्मकता देणारे ठरू शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने नक्षत्र आणि राशी गोचर करत असतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर होतो, असे म्हटले जाते. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी शनीने राहुच्या नक्षत्रातील पुढील चरणात प्रवेश केला आहे. राहु आणि शनीचा हा संयोग ५० वर्षांनंतर शततारका नक्षत्रात होत आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जात आहे.

नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच विविध चांगले योग जुळून येत आहेत. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसरा आहे. नवरात्रात नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केली जाते. या नवरात्रात जुळून येत असलेल्या शुभ योगांचा शुभ परिणाम अनेक राशींवर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

डिसेंबर महिन्यापर्यंत शनी या नक्षत्र चरणात विराजमान असणार आहे. याचा शुभ प्रभाव काही राशींवर होऊ शकतो. आर्थिक आघाडी, शिक्षण, करिअर, व्यवसाय, कुटुंब, वैवाहिक जीवनावर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक नफा मिळवू शकतात. समाधान मिळेल. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची योजना आखत असाल, तर आवडीचे काम मिळण्याची दाट शक्यता आहे. पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी प्रयत्नांवर समाधानी राहतील. नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: आगामी काळ लाभदायक ठरू शकतो. नशीब साथ देईल. काम किंवा व्यवसायाच्या कारणास्तव प्रवास करू शकता. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अनेक अपूर्ण प्रकल्प सुरू होऊ शकतात. भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. वडिलांचे सहकार्य मिळेल.

सिंह: आयुष्यात आनंद येऊ शकतो. त्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. प्रेम आणि परस्पर समन्वय वाढू शकेल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवू शकतात. शैक्षणिक क्षेत्रात अपार यशाची अपेक्षा करू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध सौद्यांमधून नफा मिळण्याची अपेक्षा शक्यता आहे.

तूळ: हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.या काळात पैसे वाचवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी प्रयत्नांवर समाधानी राहतील. नवीन प्रकल्प, करार मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांतता मिळू शकेल. प्रेम आणि परस्पर समन्वय वाढेल.

धनु: बराच काळ अडकलेला पैसा परत मिळू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना लाभाची शक्यता आहे. बेरोजगार लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. लोकांच्या करिअरसाठी वेळ अनुकूल आहे. भौतिक सुख मिळेल. जीवनात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. व्यावसायिकांना लाभाची संधी मिळू शकते. आर्थिक फायदा होऊ शकतो. काही सरकारी कामे पूर्ण करता येऊ शकतील.

मकर: या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. धैर्य आणि शौर्य वाढेल. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध सौद्यांमधून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.