शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:40 AM2024-11-07T10:40:35+5:302024-11-07T10:49:42+5:30

शनी मार्गी झाल्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणते लाभ होऊ शकतील? जाणून घ्या...

विद्यमान घडीला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. सन २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. काही दिवसांपासून शनी याच राशीत वक्री झाला होता.

शनी कुंभ राशीत असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून आला असून, मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. शनी कुंभ राशीतून मीन राशीत विराजमान झाल्यानंतर मकर राशीची साडेसाती संपुष्टात येईल आणि मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे.

त्याआधी शनी कुंभ राशीत मार्गी झाल्याचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. शनी हा नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह मानला गेला असून, माणसाला त्याच्या कर्मानुसार फल देतो, अशी मान्यता आहे. कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया...

मेष: फायदेशीर सिद्ध होऊ शकते. आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. सुविधांमध्येही झपाट्याने वाढ होऊ शकेल. वाहन, मालमत्ता, घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीही चांगली असणार आहे.

वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. बरेच दिवस गमावलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर फायदा होऊ शकेल. भरपूर नफा मिळू शकतो. पैशाची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता.

मिथुन: संमिश्र परिणाम होतील. काही चांगल्या गोष्टीही घडू शकतात. सर्वकाही नियोजन केल्यास ते चांगले होईल. नोकरीबद्दल बोलायचे झाल्यास, जर बदल करण्याचा विचार करत असाल तर अनेक संधी मिळू शकतात. पदोन्नती आणि पगारवाढीसह काही मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रात रणनीती उपयोगी पडू शकते. अशा स्थितीत बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. नशिबाची साथ मिळू शकेल.

कर्क: आनंददायी घटना घडू शकतील. आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. काही मोठी जबाबदारीही सोपवली जाऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. अध्यात्माकडे अधिक कल राहील.

कन्या: कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. करिअरबद्दल बोलायचे झाले तर कामाचे कौतुक होऊ शकते. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायासाठी अनुकूल ठरू शकते. व्यवसायात केलेले प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.

तूळ: अपूर्ण कामे आता पूर्ण होऊ शकतात. एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढू शकेल. अनेक कामांमध्ये यश मिळवू शकता. करिअर क्षेत्रात सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात. काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटच्या माध्यमातून चांगली कमाई करू शकता. लव्ह लाईफ चांगले असू शकेल.

धनु: जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. अनेक आव्हाने आली तरी त्यावर सहज मात करू शकता. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात.

कुंभ: शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. धनलाभासह अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पद आणि प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे. नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो. व्यवसायाशी निगडित लोकांना फायदा होऊ शकतो. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.