गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: ६ राशींना राजयोग, वरदान काळ; पद-पैसा वाढ, श्री शुभच करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:47 IST2025-02-19T10:35:13+5:302025-02-19T10:47:35+5:30
Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन असून, कोणत्या राशींना असीम गुरुकृपा लाभू शकेल? जाणून घ्या...

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत.
दत्तगुरुंचे द्वितीयावतार श्रीनृसिंह सरस्वती महाराजांची गुरुप्रतिपदा गुरुवारी होती. आता गजानन महाराजांचा प्रकट दिन गुरुवारी आला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिषोत्तम असलेल्या गजानन महाराजांनी अनेकांचा उद्धार केला.
गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन असून, या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीमुळे अनेक राजयोग जुळून आले असून, अनेक राशींना आगामी काळ वरदानाप्रमाणे ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. असीम गुरुकृपेचा लाभ प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जाते. मेष ते मीन या सर्व राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...
मेष: जमीन-जुमल्यात आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर तसे करू शकता. व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांनी कामात कोणत्याही प्रकारचे बदल न करणे हितावह ठरेल. प्रेमीजनांनी संवाद साधताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवनात वाद वाढण्याची संभावना आहे. जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ: सर्व समस्या दूर होतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारास पुढे नेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. नोकरीत बदल करावयाचा आहे, त्यांच्यासाठी अनुकूल काळ आहे. एखादे वाहन खरेदी करावयाचे असेल किंवा घराचे नूतनीकरण करावयाचे असेल तर त्यासाठी कालावधी अनुकूल आहे. खर्च वाढू शकतात. एखाद्या गोष्टीमुळे प्रेमिकेशी वाद होण्याची संभावना आहे. दाम्पत्य जीवनात वाद संभवतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित परिणाम मिळू शकतात.
मिथुन: स्वतःसाठी व घरात काही सामान खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च होऊ शकतो. व्यवसाय उत्तम चालेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. नोकरी बदलावयाची आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. अधिक प्रसन्न व्हाल. जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात यशस्वी होऊ शकता.
कर्क: व्यापाऱ्यांना बाजारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. असे असले तरी नोकरीत किंवा व्यापारात कोणत्याही प्रकारे अहंकारी होऊ नका. कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यासाठी काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास व ज्ञान प्राप्तीसाठी जास्त मेहनत करावी लागेल. त्यांचा बहुतांश वेळ मित्रांशी गप्पा मारण्यात जाण्याची संभावना असून त्यांनी तो टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या गोष्टीने प्रेमिकेशी वाद होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जोडीदाराच्या सहवासात घालविण्याचा प्रयत्न करावा.
सिंह: निष्काळजीमुळे एखादा आजार बळावण्याची संभावना आहे. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी. व्यावसायिकांसाठी काळ चांगला आहे. नवीन व्यापारात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कोणाशी वाद घालणे टाळावे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी वेळेचा सदुपयोग करावा. वाणीच्या प्रभावाने वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते.
कन्या: व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारात आजवर जी काही मेहनत केली आहे त्याचा लाभ त्यांना होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहील. मोठी आर्थिक देवाण-घेवाण करण्यास कालावधी अनुकूल नाही. प्रेमीजनांसाठी आठवडा उत्तम आहे. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. व्यापारी एखादा नवीन सौदा करू शकतील. ते व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यात यशस्वी होऊ शकतील.
तूळ: शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून सकाळचे चालणे व योगासने ह्यांना दिनचर्येत समाविष्ट करावे. काही फुटकळ कामात जास्त पैसा खर्च कराल. व्यापाऱ्यांनी कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये, अन्यथा नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याची नोकरी चालूच ठेवावी. नोकरीत बदल केल्यास त्रास होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. वैवाहिक जीवनात काही गैरसमजांमुळे त्रास होऊ शकतो.
वृश्चिक: सावध राहावे लागेल. प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची संभावना आहे. ते कामात प्रगती करू शकतील. वैवाहिक जीवनात कटुतेमुळे शांतता भंग होऊ शकते. जोडीदार नाराज होण्याची शक्यता आहे. व्यस्त जीवनातून थोडा वेळ मुलांसाठी काढून त्यांना फिरावयास घेऊन जावे. व्यापारात गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते.
धनु: आगामी काळ अत्यंत चांगला आहे. बाहेरील तळकट पदार्थ खाणे टाळावे. व्यापारास कालावधी अनुकूल आहे. व्यापार उत्तम चालेल असा एखादा नवीन प्रकल्प मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. कार्यालयीन राजकारणापासून त्यांनी दूर राहावे. बँकेतील शिल्लक उत्तम असेल. एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमिकेशी संवाद साधून तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यासच नाते टिकू शकेल, अन्यथा त्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी भरपूर रोमांस करू शकाल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते यशस्वी होऊ शकतील.
मकर: काम करत असताना अधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी. दुर्लक्ष केल्यास त्रास अजून वाढू शकतो. व्यापाऱ्यांनी व्यवसाय चालवताना इगो, अहंकार दूर ठेवून संयमाने कामे करावीत. नोकरी बदलण्यासाठी प्रतिकूल काळ असल्याने जी नोकरी चालू आहे तीच करत राहावी. विद्यार्थ्यांनी अमूल्य वेळ मित्रांच्या सहवासात न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. कर्ज घेण्यासाठी कालावधी प्रतिकूल आहे. तेव्हा थोडे थांबावे. कार्यातील व्यस्ततेमुळे वैयक्तिक संबंधांकडे लक्ष देऊ शकणार नाही. नाते दृढ करण्यासाठी जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवावा. त्यामुळे नाते अधिक दृढ होऊ शकेल.
कुंभ: कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करू नये. व्यापाऱ्यांना काळ काहीसा प्रतिकूल आहे. त्यांना व्यापारात जास्त फायदा होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीचा आलेख खाली येईल. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीनुसार फळ मिळणार नसल्याने ते दुसऱ्या नोकरीचा शोध घेण्यास सुरवात करू शकतील. कुटुंबासाठी पैसे खर्च कराल. एखाद्या गैरसमजामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. लवकरात लवकर हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनात एखाद्या गोष्टीमुळे कटुता येऊ शकते. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा वाद वाढू शकतो.
मीन: भरपूर ऊर्जा राहील. वाहन चालवताना सावध राहावे. व्यावसायिकांचा व्यवसाय उत्तम चालेल. त्यांची काही कामे पुन्हा सुरु होऊ शकतात. नोकरीत बदल न करणे हितावह राहील. फुटकळ खर्च करणे टाळावे. वाहन खरेदी करावयाचे असल्यास तो विचारपूर्वक करावा. व्यक्तिगत संबंधात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे वाद होऊ शकतो. नाते टिकवून ठेवण्यासाठी जोडीदारावर शंका घेऊ नये. वैवाहिक संबंधातील माधुर्य टिकून राहील. जोडीदारासह रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. मुलांसाठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात एखादी नवीन आर्थिक योजना आखू शकता.