गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:39 IST2025-04-24T14:26:20+5:302025-04-24T14:39:16+5:30

स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला विविध राजयोग जुळून येत असून, कोणत्या राशींना याचा सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या...

चैत्र महिन्याची सांगता होत आहे. चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते. चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. यंदा, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा अवतारकार्य समाप्तीचा दिवस आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. मीन राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. तसेच विविध प्रकारचे राजयोग जुळून येत आहेत. तसेच गजकेसरी योग जुळून येत आहे.

अशा शुभ योगात येणाऱ्या श्री स्वामी स्मरण दिनाला कोणत्या राशींना सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. कोणत्या राशींना यश-प्रगतीच्या संधी मिळू शकतात. शुभ वार्ता मिळू शकतात. लक्ष्मी देवी आणि स्वामींची कृपा लाभू शकते? जाणून घेऊया...

मेष: उत्पन्न वाढू शकेल. मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. जवळच्या मित्रांसोबत खूप छान वेळ घालवाल. भागीदारीत काम करत असाल तर अतिरिक्त नफ्याच्या संधी मिळू शकतात. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढे जाणे फायदेशीर ठरू शकते. अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या प्रसिद्धी मिळू शकते. चांगल्या उत्पन्नामुळे सुखसोयींवर खर्च करू शकाल. कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकेल.

वृषभ: लक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. करिअरच्या क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कामात आता यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कामाचे कौतुक होऊ शकते. पदोन्नतीसह पगारात वाढ होऊ शकते. समाजात आदर, मान-सन्मान वेगाने वाढू शकतो. करिअरच्या क्षेत्रात प्रभावशाली लोकांशी चांगले व्यावसायिक संबंध असतील. अशा प्रकारे तुमचे व्यावसायिक नेटवर्क अधिक मजबूत होईल.

मिथुन: नोकरी आणि व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त होऊ शकेल. ज्या लोकांनी दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांनाही यश मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाबाबत बनवलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. जीवनात आनंद आणि शांतता लाभू शकेल.

कर्क: ज्ञानात भर पडू शकेल. आत्मविश्वास वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना फायदे मिळू शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. काही नवीन धडे मिळतील. जोडीदारामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. जोडीदारामुळे आयुष्यात आनंद, सौभाग्य आणि समृद्धी मिळू शकते. धाडस वाढू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. उत्पन्नात वाढ होण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

सिंह: अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसाय किंवा मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता. भविष्यात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात भागीदारामुळे फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात उत्साह राहू शकेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जितके अधिक व्यावहारिक राहा, तितका फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्यासोबतच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. मुलांच्या संदर्भातील समस्या संपुष्टात येऊ शकतात. बऱ्याच काळापासून एखाद्या प्रकल्पावर कठोर परिश्रम करत असाल तर आता त्यात यश मिळवू शकता. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

तूळ: जोडीदाराच्या मदतीने कामे सहज पूर्ण होऊ शकतील. कला, सर्जनशीलता इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ फायदेशीर ठरू शकेल. अध्यापन, प्रशिक्षण, पत्रकारिता इत्यादींशी संबंधितांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. मानसिकदृष्ट्या बरे वाटेल. आत्मविश्वास उंच राहील. मुलांकडून फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी समन्वय राहील.

वृश्चिक: नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट आणि वाहन संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळू शकते. मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतील.

मकर: भरघोस नफा मिळू शकतो. कुटुंबासोबतचे जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. काही शुभ कार्य होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता.

कुंभ: शनीच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. समस्यांपासून दिलासा मिळू शकेल. पदोन्नतीमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शुक्र ग्रहाच्या कृपेने प्रेम जीवन चांगले राहू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

मीन: अनेक बदल दिसून येऊ शकतात. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. आत्मविश्वास वाढू शकेल. मानसिक शांतता लाभू शकेल. भविष्याबद्दल चांगले विचार करू शकाल. संवाद कौशल्य उत्कृष्ट असेल. वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल. प्रेम आणि सुसंवाद राखण्यात यशस्वी होऊ शकता. करिअरमध्ये खूप फायदे मिळू शकतात. कष्टाचे चीज होऊ शकते. अशा परिस्थितीत यशाचा मार्ग मोकळा होईल. संयमाने पुढे गेलात तर नक्कीच यश मिळेल. कल अध्यात्माकडे वाढू शकतो. सर्जनशीलता वाढेल. तर्कशक्ती वाढेल. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.