Shukra Gochar 2023: शनीपाठोपाठ शुक्र करणार कुंभेत प्रवेश; चार राशींना होणार लाभ, एका राशीला होणार नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:53 PM2023-01-20T15:53:18+5:302023-01-20T15:56:44+5:30

Shukra Gochar 2023: शुक्र ही कल्याणकारी देवता मानली जाते. या ग्रहाच्या संक्रमणाने अनेक राशींचे नशीब बदलते, तर काही राशींना नुकसान देखील सहन करावे लागू शकते. आता तो २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३. ३४ मिनिटांनी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ही त्याचा मित्र ग्रह शनीची रास आहे. शुक्राच्या या संक्रमणाने ५ राशींच्या नशिबाची कुलुपे उघडणार आहेत. त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊ.

या राशीचे लोक त्यांच्या संभाषण शैलीने लोकांना प्रभावित करतील. शुक्राच्या संक्रमणाने ते अनेक प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे त्याची कारकीर्द वेगवान होईल. बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. तुमच्या अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात नवीन आनंद आणि उत्साहाचा संचार होईल. शुक्रवारी पाकिटात चांदीचा तुकडा ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

या राशीच्या लोकांची आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. लहान भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही धर्मादाय कार्यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या मनाला प्रचंड समाधान मिळेल. कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या तरुणांची इच्छाही पूर्ण होऊ शकते. कुटुंबात एकता आणि शांतता राहील. दानधर्म केल्याने मानसिक समाधान मिळेल. यशस्वी होण्यासाठी, देवी लक्ष्मीची पूजा करण्यास आणि दर शुक्रवारी तिला कमळाचे फूल अर्पण करण्यास विसरू नका.

शुक्रच्या संक्रमणाने या राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होणार आहे. विवाहित लोक जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. अविवाहित लोकांना त्यांच्या आवडीचा जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल. तुम्हाला काही नवीन जबाबदारीही मिळू शकते. चांगल्या परिणामांसाठी बेडरूममध्ये गुलाबी रंगाचा स्टोन ठेवा.

लेखन कार्याशी संबंधित लोकांचे भाग्य सुरू होणार आहे. यामध्ये लेखक, ब्लॉगर, पत्रकार, कवी, कादंबरीकार अशा लोकांना करिअरमध्ये चांगली संधी आहे. तुमचे लेखन कौशल्य आणखी सुधारेल. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार करू शकता किंवा कुटुंबासोबत तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. तुम्हाला आयुष्यात तुमच्या आई-वडिलांचा आणि शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. शुक्र मंत्राचा दररोज जप केल्याने चांगला लाभ होईल.

शुक्रच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. चैनीच्या गोष्टींपासून दूर राहा आणि बजेट बनवा आणि तुमच्या गरजेनुसार पैसे खर्च करा, अन्यथा तुम्ही आर्थिक संकटात अडकू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या. चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला आजारी पडण्याचा धोका होऊ शकतो. आपल्या चारित्र्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही कायदेशीर वादात अडकू शकता. तुम्ही शुक्रवारी देवीच्या मंदिरात जा आणि गोसेवा करा