Shukra gochar in Cancer : शुक्राचं कर्क राशीत गोचर; धनलाभाचे योग… कसा राहिल तुमच्या राशीवर प्रभाव, उपायही पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 10:16 AM2022-08-06T10:16:16+5:302022-08-06T10:31:42+5:30

७ ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राला भौतिक सुखांचा देवता म्हटले जाते, शुक्र ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो.

७ ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राला भौतिक सुखांचा देवता म्हटले जाते, शुक्र ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह देखील वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. शुक्र आता कर्क राशीत जाणार आहे आणि त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. कर्क राशीत शुक्राच्या प्रवेशाने काही राशीच्या लोकांच्या खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते, तर काही राशीच्या वैवाहिक जीवनातील जवळीक आणखी वाढू शकते. शुक्राच्या या गोचराचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होईल, हे पाहुया.

मेष - शुक्राच्या गोचरादरम्यान मेष राशीच्या लोकांना सामाजिकदृष्ट्या सन्मान मिळेल. जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांची प्रगतीही होईल. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. सरकारी नोकरीची संधी मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध कायम राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील. या कालावधीत तुम्ही बजरंग बाणचं पठण करणं फायदेशीर ठरू शकतं.

वृषभ - सर्व कामांमध्ये रस अधिक रस निर्माण होईल. या गोचरादरम्यान तुम्ही सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय राहाल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल करायचे असतील तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. व्यवसायात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या आणि नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा. या कालावधीत दुर्गा मातेची पूजा करा.

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी चांगले संबंध राहतील. काही कौटुंबिक वाद पूर्वीपासून सुरू असतील तर ते दूर होताना दिसतील. परदेशातील कामात चांगले लाभ दिसून येतील, करिअरमध्ये बढती दिसून येईल आणि वैवाहिक जीवनात संतती प्राप्तीची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ चांगला घालवाल, आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ खूप अनुकूल असेल. गणरायाची पूजा करा आणि दुर्वा अर्पण करा.

कर्क - कर्क राशीच्या लोकांमध्ये कालावधीदरम्यान संयम वाढेल. यामुळे तुम्हाला समाजात प्रतिष्ठित स्थान मिळेल, चांगलं पदही मिळण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च वाढू शकतो. तुम्हाला काही मानसिक तणाव असू शकतो. भागीदारीसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. वैवाहिक जीवनातील वाद संपुष्टात येतील. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जुन्या आजारापासूनही या कालावधीत आराम मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत दुर्गा सप्तशतीचं पठण करा.

सिंह - विदेशातील कामकाजाशी निगडीत असलेल्या लोकांना या कालावधीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रोजगार आणि व्यवसायासाठी विदेशात जायचं असेल तर अनुकूल परिस्थिती राहिल. वाणीवर नियंत्रण ठेवा, तसंच शिक्षणाच्या दृष्टीनं हा कालावधी अनुकूल राहिल. वैवाहिक जीवनात मधुर संबंध राहतील. दुर्गा कवचाचं नियमित पठण करा.

कन्या - या कालावधीदरम्यान सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उत्पन्नात वाढ होईल, तसंच आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. जुनी येणी वसूल होतील. यादरम्यान मानसिक तणावही वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कालावधी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीही मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करा. या कालावधीत गरजूंना आवश्यक वस्तूंचं दान करा.

तूळ - या कालावधीदरम्यान विचारपूर्वक गुंतवणूक करा. या कालावधीत पदोन्नतीचीही संधी मिळेल आणि सरकारी कामकाजातही यश मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत लोकांना फायदाही होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांसाठी अनुकूल कालावधी. या कालावधीत बजरंग बाणचं पठण करा.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांना व्यावसायिक पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. परदेशी ग्राहकांमुळे लाभाचीही शक्यता आहे. तुमचा कल धार्मिक कार्यात राहील. वैवाहिक जीवनात खूप प्रेम आणि आपुलकी वाढेल. शिक्षणाशी संबंधित लोकांना फायदा होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. एखाद्या दीर्घ आजारातून आराम मिळण्याची शक्यता आहे. तब्येतीत सुधारणा दिसेल. या कालावधीत गरजूंना वस्तू दान करा.

धनु - कर्क राशीत शुक्र प्रवेशामुळे धनु राशीच्या लोकांना या काळात कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. तसेच या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढू शकतात. यावेळी प्रत्येक व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना अडथळे देखील येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला पैशाची हानी होण्याची समस्या येऊ शकते. तुम्हाला कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. कोणाकडूनही कर्ज घेऊ नका, तुमचे नुकसान होऊ शकते. या कालावधीत विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा.

मकर - तुमच्या जीवनात आनंद येईल. सर्व मतभेद संपतील. कादेशीर प्रकरणांत यश मिळू शकते. परदेशी व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात जास्त मेहनत करावी लागू शकते. परदेशात जाणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. या कालावधीत भगवान श्री शंकराची पूजा करा.

कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना या काळात जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तसेच, या काळात तुमचा खर्चही वाढू शकतो. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात काही समस्या येऊ शकतात. खर्चावर अधिक नियंत्रण ठेवा. प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. या कालावधीत धनलाभाचीही शक्यता आहे. या कालावधीत दुर्गा सप्तशतीचं पठण करा.

मीन - तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम, गोडवा आणि आपुलकी पाहायला मिळेल. यश आणि लाभ देखील संभवतात, तुमची एकाग्रता वाढेल. तुम्हाला अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल आणि व्यावसायिकदृष्ट्या खूप सकारात्मक परिणाम देईल. तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत गरजूंना आवश्यक वस्तूंचं दान करा.