शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ९ राशींना राजयोग; अत्यंत शुभ काळ, अनेक लाभ, दिवाळीच दिवाळी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 01:22 PM 2022-10-18T13:22:56+5:30 2022-10-18T13:32:31+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुक्राचे स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत होणारा प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ऑक्टोबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला असून, सर्वांनाच आता दिवाळीचे वेध लागलेले आहेत. यंदाची दिवाळी अनेकार्थाने विशेष असणार आहे. या दिवाळीत अनेकविध उत्तम योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर ज्योतिषीय दृष्ट्याही हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा तसेच शुभ मानला जात आहे. (shukra gochar in tula rashi 2022)
१६ ऑक्टोबर, १७ ऑक्टोबर रोजी एकमागून एक अनुक्रमे मंगळाचा मिथुन प्रवेश, नवग्रहांचा राजा सूर्याचा तूळ प्रवेश झाल्यानंतर आता शुक्राचा तूळ राशीत प्रवेश होत आहे. १८ ऑक्टोबर रोजी शुक्र बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून आपलेच स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान होत आहे. (venus transit in libra 2022)
शुक्र हा तूळ राशीचा स्वामी मानला गेला आहे. त्यामुळे शुक्राचा तूळ प्रवेश अनेकार्थाने विशेष मानला जात आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ हा अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरू शकेल, तुमची रास कोणती? जाणून घेऊया...
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश अपार यश घेऊन येणारा ठरू शकेल. तुमचे अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. व्यवसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकेल. तुम्ही एक मोठा व्यवसाय करार करू शकता ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा नफा होऊ शकेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी असू शकेल.
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश लाभदाय करू शकेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते. दिवाळीत महागड्या भेटवस्तू मिळू शकतात. तुम्ही पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद टाळणे चांगले.
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे दाम्पत्य जीवन आणि वैवाहिक जीवन आनंददायी होऊ शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहू शकेल.
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश अत्यंत शुभ ठरू शकेल. आपण आपले घर सुशोभित करण्यासाठी खर्च करू शकता. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला वाहन सुख मिळू शकते. व्यवसायिकांना या सणासुदीत अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. कठोर परिश्रम घेण्यात कमी पडू नये. आर्थिक लाभाच्या रूपात मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन उत्तम असू शकेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अनेक नवीन ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. तुम्ही काही महागड्या वस्तू खरेदी करू शकता. मात्र, या कालावधीत कोणालाही पैसे ने देण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल.
कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. या काळात तुमच्या संचित संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्हाला यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल. तुमच्या क्षेत्रातील कामगिरीतही सुधारणा होईल. तुमचा पैसा अडकला असल्यास सणापूर्वी तुम्हाला परत मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होऊ शकतात.
तूळ राशीच्या व्यक्तींना राशीस्वामी शुक्राचा प्रवेश उत्तम ठरू शकेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल. तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतील. व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल होतील. या काळात जिथे पैसे गुंतवाल, ते तुम्हाला भविष्यात चांगले परतावा देऊ शकतील. प्रेमात असलेल्यांच्या बाबतीत हे संक्रमण सकारात्मक ठरू शकेल.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात सावधगिरीने काम केल्यास परिस्थिती अनुकूल राहू शकेल. सरकारी कामांमध्ये यश मिळू शकेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असू शकेल.
धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल. तुम्हाला लाभ आणि सन्मान मिळेल. समाजात मान वाढू शकेल. लोकं तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतील. आपण एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत चांगले परिणाम मिळू शकतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे.
मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात खूप सावध राहण्याची गरज आहे. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला मेहनतीचा फारसा फायदा मिळणार नाही. ऑफिसमध्ये बॉस आणि सहकाऱ्यांशी वादही होऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या गैरसमजामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या काळात काही विद्यार्थी संशोधनाकडे वाटचाल करू शकतात.
कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश यशकारक ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्हाला आर्थिक बाबतीतही फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील. तुमचे आरोग्यही उत्तम राहू शकेल. वैवाहिक जीवनातही खूप आनंद असेल.
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. तुमच्या क्षमतेचा गैरवापर करणे टाळावे. कोणत्याही प्रकारच्या बेटिंगमध्ये पैसे लावू नका किंवा कुठेही गुंतवणूक करू नका. जबाबदाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. ऑफिसमध्ये काम करणे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकते. यावसायिकांनी आपल्या निर्णयांवर पुन्हा एकदा त्यांच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.