मालव्य राजयोग: ६ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, यश-प्रगतीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 11:47 AM2024-08-28T11:47:02+5:302024-08-28T11:54:44+5:30

सप्टेंबर महिन्यात जुळून येत असलेल्या राजयोगाचा कोणत्या राशींना सकारात्मक लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टचा महिना विविध योगांनी युक्त होता. ऑगस्ट महिन्यात श्रावणातील अनेकविध व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे करण्यात आले. आता सप्टेंबर महिन्यात विविध योग जुळून येणार आहेत. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात तीन ग्रहांचे गोचर असणार आहे.

सप्टेंबर महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र हे तीन ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. विशेष म्हणजे बुध एकाच महिन्यात दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रह विद्यमान घडीला कन्या राशीत असून, १८ सप्टेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश होणार आहे. यामुळे मालव्य राजयोग जुळून येणार आहे.

मालव्य राजयोगाचा काही राशींना चांगला लाभ होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार, कुटुंब, आर्थिक आघाडीवर शुक्राच्या मालव्य राजयोगाचा कसा प्रभाव असू शकतो? जाणून घ्या...

मेष: व्यवसाय आणि नोकरीमध्ये विशेष लाभ होऊ शकतो. कामाचे कौतुक होईल. प्रमोशनसोबत पगार वाढू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही यश मिळू शकते. कार्यालयात दीर्घकाळ चाललेल्या वादविवादात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही विशेष लाभ मिळू शकतो. नवीन व्यवसाय करारावर स्वाक्षरी होऊ शकते. अधिक पैसे मिळवू शकता. वाहन आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनही चांगले जाणार आहे.

वृषभ: पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. जे काही मिळवण्यासाठी दीर्घकाळ मेहनत करत आहात, ते मिळू शकेल. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची चर्चा होऊ शकते. दिवाळीत महागडे भेटवस्तू मिळू शकतात. पैसे वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद टाळणे चांगले.

कर्क: अतिशय शुभ परिणाम मिळू शकतात. घर सजवण्यासाठी खर्च करू शकता. सणासुदीच्या काळात अपेक्षेपेक्षा जास्त नफा कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते. मेहनत कमी करू नका. कामावर खुश झाल्यानंतर अधिकारी बढती करू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ आर्थिक लाभाच्या रूपात मिळण्याची अपेक्षा आहे. प्रेम आणि रोमान्सच्या दृष्टीनेही अद्भुत असणार आहे.

तूळ: विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतो. पदोन्नती सोबतच चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

धनु: आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठ अधिकारी कामावर समाधानी राहू शकतात. प्रमोशनसह पगारात चांगली वाढ होऊ शकते. नवीन मित्र बनवू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मकर: आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बदलासाठी प्रयत्न करायचे असतील तर संधी अनुकूल राहील. जमीन, मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागू शकतील. निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असला तरी संधी अनुकूल आहे. अनेकार्थाने अनुकूल काळ ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.