३१ मार्चपासून येणार 'या' राशींच्या लोकांना येणार 'अच्छे दिन'; होणार लाभच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:15 PM2022-03-27T18:15:48+5:302022-03-27T18:29:27+5:30

३१ मार्च रोजी शुक्र राशी परिवर्तन करणार आहे. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतील, तर काही राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.

मेष - तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल आणि अतिरिक्त खर्चाबद्दल तुम्हाला चिंता सतावेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायाच्या विस्तारासाठी गुंतवणूक करू शकता. व्यवसायात वाढ होईल आणि लाभाच्या संधी मिळतील.

वृषभ - नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढीसाठी तुमच्या मित्राचे सहकार्य मिळू शकते. तुमच्या मालमत्तेतून धन मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यांच्या योजना बनतील.

मिथुन - कुटुंबात शांतता आणि सौहार्द राखण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कार्य, लेखन इत्यादी कार्यात मन व्यस्त राहील. उत्पन्न वाढेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात.

कर्क - कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. आईकडून धन मिळण्याची शक्यचा आहे. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम मिळू शकतात. नोकरीमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि तुमचं कार्यक्षेत्र वाढेल.

सिंह - शैक्षणिक कार्याचे सुखप परिणाम दिसतील. नोकरीत बदलाची संधी मिळू शकते. तुम्हाला उच्च पद मिळू शकते. ३१ मार्चनंतर वाहनावरील खर्च वाढू शकतो.

कन्या - व्यवसायात काही अडचणी येतील, पण एखाद्या मित्राच्या मदतीनं व्यवसायातही सुधारणा होईल. लाभाच्या संधी मिळतील. उत्पन्नात सुधारणा होईल. मालमत्ता उत्पन्नाचे साधन बनू शकते.

तूळ - मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीमध्ये परदेशवारीची शक्यता आहे. कष्ट वाढू शकतात. मान-सन्मानही मिळू शकतो. वाहन आणि कपड्यांवरील खर्च वाढू शकतो.

वृश्चिक - आर्थिक ताळमेळ सांभाळावा. अतिरिक्त खर्च होऊ शकतो. व्यवसायात लक्ष द्या, काही अडचणी येऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. लेखन इत्यादी बौद्धिक कामे उत्पन्नाची साधनं बनू शकतात.

धनू - कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकीय खर्च वाढू शकतो. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून धनलाभ होऊ शकतो.

मकर - मनःशांती राखण्याचा प्रयत्न करा. तुमचं काम आणखी वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होतील. कपडे, दागिने इत्यादींकडे कल वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, पण जागा बदलाचेही योग संभवतात. कौटुंबीक आनंदात थोडं कमतरता दिसेल. ३१ मार्चनंतर वाहन-सुख वाढण्याची शक्यता आहे.

मीन - एखाद्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात थोडी सुधारणा होऊ शकते. उत्पन्न वाढेल.