लॉक डाऊन काळात अनेक व्यवसाय सुरू झाले तर अनेक बंद पडले. तरीदेखील परिस्थितीसमोर न झुकता मनुष्याने फिनिक्स पक्षासारखी वेळोवेळी राखेतून भरारी घेतली. काही डाव यशस्वी झाले तर काही फसले. परंतु हार न मानता प्रयत्न करत राहणे, हेच तर यशाचे मुख्य सूत्र आहे. त्यानुसार नवीन क्षेत्रात तुम्हीसुद्धा पाय रोवू पाहत असाल, तर त्याला थोडीशी मुहूर्ताची जोड द्या. नवीन कामाच्या शुभारंभाला मुहूर्त कशाला, हा प्रश्न अनेकांच्या मनात येईलही, परंतु आपल्या प्रयत्नांना जेव्हा ग्रहांचे पाठबळ मिळते, तेव्हा कामाला अधिक गती येते. म्हणून ज्योतिष शास्त्राने काम आणि वार यांची आखणी करून श्रीगणेशा करावा, असे सुचवले आहे. हे वार शुभ आहेतच. त्या बरोबरीने मुहूर्त पाहणेही जास्त उचित ठरते. ते शक्य नसेल तर दुपारी ११.३० ते १२.३० ही वेळ शास्त्राने शुभ वेळ ठरवली आहे.