१७ ऑगस्टपर्यंत सूर्य-शनी समसप्तक योग: ‘या’ ४ राशींना पद, प्रतिष्ठा, पैसा; पिता-पुत्राची कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 09:06 AM2022-07-23T09:06:12+5:302022-07-23T09:10:41+5:30

पिता-पुत्र असलेले सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले गेले असून, या दोन ग्रहांचा विशेष समसप्तक योग जुळून आला आहे. कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळतील? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे भ्रमण, त्यांची एकमेकांवर असलेली दृष्टी, स्थाने, राशीपरिवर्तन याला अनन्य साधारण असे महत्त्व असते. आताच्या घडीला पिता-पुत्र असले, तरी पक्के वैरी मानल्या गेलेल्या दोन ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहे. (sun and saturn samsaptak yog 2022)

समसप्तक योग म्हणजे एक ग्रह हा दुसऱ्या ग्रहापासून सातव्या स्थानी असतो, तेव्हा हा योग जुळून येतो. आताच्या घडीला नवग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत विराजमान आहे. तर, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी मकर राशीत वक्री आहे. (surya shani samsaptak yog 2022)

सूर्य आणि शनी हे एकमेकांपासून सातव्या स्थानी असल्यामुळे सूर्य आणि शनीचा समसप्तक योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, समसप्तक योग विशेष मानला जातो. सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले गेले आहेत. मात्र, ते एकमेकांचे शत्रू ग्रह असल्याचेही सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग घडवतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. सूर्य आणि शनीच्या स्थानांत बदल झाला आहे. १७ ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत विराजमान असेल.

ज्योतिषशास्त्रात या दोन ग्रहांना खूप महत्वाचे मानले जाते. शनी हा कर्मप्रधान आणि न्यायी असून, सूर्य हा नेतृत्व, यश यांचा कारक आहे. या दोन्ही ग्रहांच्या समसप्तक योगाचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

मिथुन राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत वा कार्यक्षेत्रात बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. तसेच, व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना समसप्तक योग लाभदायक ठरू शकतो. तुमचे उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे ते चांगले पैसे कमवू शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना शुभवार्ता मिळू शकेल. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

तूळ राशीच्या व्यक्तींना समसप्तक योगामुळे मान-सन्मान मिळू शकतो. करिअर आणि व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकते. व्यावसायिकांनाही खूप फायदा होईल. तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात लहान-मोठे प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमची रखडलेली कामे यावेळी पूर्ण होऊ शकतील. तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो.

मीन राशीच्या लोकांसाठी शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे तयार झालेला समसप्तक योग लाभदायक ठरेल. या काळात तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. तसेच तुम्हाला व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. यासोबतच तुमची कार्यशैलीही सुधारेल, ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. तुम्हाला बॉसची साथ मिळेल.