३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:57 AM2023-02-13T09:57:13+5:302023-02-13T09:57:13+5:30

sun transit in aquarius 2023: सूर्याचा शत्रू ग्रहाच्या राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...

नवग्रहातील सर्व ग्रह नियोजित काळाने नियमितपणे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रहांच्या या राशी गोचराचा सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य फेब्रुवारी महिन्यात मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. १३ फेब्रुवारी रोजी शनीच्या कुंभ राशीत सूर्य विराजमान होईल. (sun transit in aquarius 2023)

सुमारे महिनाभर सूर्य कुंभ राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. त्यानुसार, सूर्याचे कुंभ राशीतील भ्रमण कुंभ संक्रांती म्हणून ओळखले जाते. आताच्या घडीला कुंभ राशीत नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी विराजमान आहे. पौराणिक मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी पिता-पुत्र मानले गेले आहेत. सुमारे ३० वर्षांनी कुंभ राशीत सूर्य आणि शनीची युती होत आहे. (surya gochar in kumbh rashi 2023)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनी शत्रू ग्रह मानले गेले आहेत. मात्र, सूर्याचे कुंभ राशीतील गोचर काही राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ, लाभदायक ठरू शकणारे आहे. तर काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सूर्याचा कुंभ प्रवेश म्हणजे कुंभ संक्रांती तुमच्यासाठी कशी असेल, तुमच्यावर पिता-पुत्र, शत्रू ग्रहांचा प्रभाव कसा राहील, ते जाणून घेऊया... (kumbh sankranti 2023)

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. नवीन ओळखी होतील. व्यावसायिकदृष्ट्या खूप अपेक्षा असतील. आपण शब्द जपून वापरावेत. कोणतीही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यास सक्षम असाल. तसेच बुद्धिमत्तेचा यथायोग्य वापर कराल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. सर्वत्र आनंदाचे वातावरण असेल. नवीन घर घ्यायचे असेल तर आगामी काळ उपयुक्त ठरू शकेल. पैशाशी संबंधित बाबींमध्येही हा काळ खूप छान असेल. हुशारीने व्यवहार कराल. मात्र, बोलताना शब्दप्रयोग जपून करावेत.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश दिलासादायक ठरू शकेल. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. समस्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. नोकरी व्यवसायात नातेवाईकांचा प्रभाव पडू शकतो. मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक लाभाची संधी असेल. प्रगतीकारक संधीही मिळू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश मनोकामना पूर्ण करणारा ठरू शकेल. प्रियकर परत येण्याचीही शक्यता आहे. आधीची कंपनी तुम्हाला परत बोलावण्याची शक्यता आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. वाद जास्त गांभीर्याने घेऊ नयेत. तसेच त्यावर प्रतिक्रिया देणे टाळावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश महत्त्वाचा ठरू शकेल. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. वैवाहिक जीवन खूप व्यस्त होऊ शकेल. जोडीदारामध्ये एखाद्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो. भागीदारीत काम करणारे लोक एखाद्या गोष्टीबद्दल तणावात असतील. आर्थिक बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी टीम म्हणून काम करणे तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीत चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहावे. व्यवसायानिमित्त लांबच्या प्रवासाला जावे लागेल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चांगले आर्थिक परिणाम मिळू शकतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आगामी काळात चांगली बातमी मिळू शकते. पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. त्याच चुका पुन्हा करू नका. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मध्यम स्वरूपाचेच निकाल मिळतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा कुंभ प्रवेश काहीसा प्रतिकूल ठरू शकेल. तुमच्यात संयम आणि विश्वासाची कमतरता असू शकते. नीट विचार करून संयमाने चालावे, अन्यथा नुकसान होईल. नोकरी आणि बिझनेसमध्येही या काळात तुम्हाला खूप संतुलित लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा त्रास होईल. तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. जुनी कामे पूर्णपणे आटोक्यात आणू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही लोक त्रास देण्याची एकही संधी सोडणार नाहीत. नवीन लोक भेटतील, जे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरतील. आगामी काळात मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. नवीन कामातून खूप फायदा होईल. धैर्य आणि संयमाने काम करण्याची गरज आहे. आरोग्याबाबत गाफील राहू नका. व्यवसायात काही गुंतवणूक करायची असेल, तर सखोल चौकशी केल्यानंतरच कुठेतरी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

कुंभ राशीत सूर्य विराजमान होत आहे. कुंभ राशीची साडेसातीही सुरू आहे. आगामी काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकेल. नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. व्यापारी वर्गाला या काळात चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्यावी. सामाजिकदृष्ट्या हा काळ चांगला असणार आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा कुंभ प्रवेश काहीसा दिलासादायक ठरू शकेल. स्वतःसाठी वेळ द्यावा. कोणतेही आक्रमक पाऊल उचलू नका. कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे सहकार्य मिळेल. आपल्या मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.