Makar Sankranti Sun Transit 2023: पिता-पुत्र एका राशीत: सूर्याची कृपा, शनीचे लाभ; तुमच्यासाठी कशी असेल मकर संक्रांती? शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 08:37 AM2023-01-14T08:37:56+5:302023-01-14T08:48:27+5:30

Makar Sankranti Sun Transit 2023: सूर्याचा मकर प्रवेश ८ राशींसाठी सर्वोत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात सूर्याला अत्याधिक महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य साधारण एक महिना एका राशीत विराजमान असतो. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. १४ जानेवारी रोजी सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीतून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करत आहे. (sun transit in capricorn 2023)

सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाला मकर संक्रांती म्हटले जाते. सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर धनुर्मासाची समाप्ती होते. मकर राशीत नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह शनी विराजमान आहे. सन २०२३ चा विशेष योगायोग म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पिता-पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी एकाच म्हणजेच मकर राशीत असतील. (surya gochar in makar rashi 2023)

पौराणिक कथांनुसार, पिता-पुत्र मानले गेलेले सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू ग्रह असल्याचे सांगितले जाते. मकर संक्रांतीला या दोन्ही ग्रहांचा युती-योग जुळून येत आहे. सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशींना लाभ मिळू शकेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी हा सर्वोत्तम काळ ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश शुभ ठरू शकेल. व्यावसायिक आघाडीवर कामगिरी चांगली असेल. गांभीर्याने काम कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगला समन्वय प्रस्थापित करू शकाल. काही महत्त्वाचे काम मिळण्याची अपेक्षा करू शकता. आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याचीही शक्यता आहे. कामाला योग्य दिशा मिळण्याची आशा आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. स्वभावात संयम आणि गांभीर्य जाणवेल. आत्मचिंतनाने योग्य दिशा मिळू शकेल. कामात स्थिरता आणण्याचा प्रयत्न कराल. मेहनतीच्या जोरावर यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढील लागेल. तुमचा कल अध्यात्माकडे असेल. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. विद्यार्थांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. आत्मचिंतन करणे उपयुक्त ठरू शकेल. चुका शोधून त्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. कामात अनपेक्षित अडथळा येण्याची शक्यता आहे. काही अज्ञात भीती वाटू शकेल. निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळू शकते. संशोधनाकडे तुमची एकाग्रता वाढेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद कमी होणे अपेक्षित आहे. घरगुती सौहार्द वाढेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात. भागीदारीतील व्यवसायात सुरू असलेला कोणताही वाद मिटण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश शुभ ठरू शकेल. वैचारिक विरोधक आणि शत्रूंवर नियंत्रण ठेवाल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोणत्याही वादात विजय मिळण्याचीही स्थिती असेल. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळू शकते. नवीन नोकरीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली असेल. लक्झरी आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन कर्ज घेऊ शकता.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. गांभीर्याने निर्णय घेऊ शकाल. व्यावसायिक जीवनात वाढ होण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याची योजना आखू शकता. विद्यार्थी कोणत्याही उच्च शिक्षणात प्रवेश घेण्याबाबत योजना करू शकतात. नोकरदार कामात अधिक व्यस्त राहतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. अस्थिरतेची भावना जाणवेल. संयमाची कमतरता जाणवेल. कामाचा कंटाळा येऊ शकेल. सामाजिक आणि व्यावसायिक कारणांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची योजना आखू शकता. जमिनीच्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्याची अपेक्षा करू शकता. सहकारी तुमचे समर्थन करतील. भावंडांशी सुरू असलेले वाद मिटू शकतील. कौटुंबिक शांतता आणि सौहार्द वाढेल. छोट्या सहलींवर जाण्याची योजना आखू शकता. व्यावसायिक नेटवर्क वाढेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या नोकरीत अचानक बदलीची अपेक्षा करू शकतात.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश शुभ ठरू शकेल. मुलांमध्ये व्यस्त असाल. मुलांना कौटुंबिक आणि सामाजिक मूल्ये देण्याच्या योजनेवर काम कराल. घराशी संबंधित कोणत्याही नियोजनात किंवा सामाजिक कार्यक्रमात तुम्ही व्यस्त राहू शकता. अनावश्यक खर्च नियंत्रणात येऊ शकतील. आर्थिक स्थैर्य वाढेल. कुटुंबासमवेत आवडत्या आणि स्वादिष्ट भोजनाचाही लाभ घ्याल.

मकर राशीत सूर्याचे आगमन होत आहे. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. संयम वाढेल. ध्येयाकडे लक्ष केंद्रित कराल. कामाचा आनंद घेऊ शकाल. तुमची सर्जनशीलता सुधारेल. जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद कमी होतील. कुटुंबात सौहार्द वाढेल. सूर्याचा तुमच्या राशीतील प्रवेश शुभ ठरू शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश संमिश्र ठरू शकेल. संयमाचा अभाव असेल. गोंधळून जाऊ शकाल. निर्णय क्षमतेवर नकारात्मक परिणाम होईल. आत्मचिंतन करणे उपयुक्त ठरू शकेल. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावे. अनपेक्षित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीकडे विशेष लक्ष केंद्रीत करावे लागू शकते. परदेश दौऱ्याच्या नियोजनावर काम करू शकता. परदेशातून मदत मिळू शकेल.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मकर प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याचीही आशा असेल. नोकरदारांना इंटेन्सिव्ह मिळू शकतात. आर्थिक स्थिती संतुलन राहील. जुन्या गुंतवणुकीच्या बाबतीत नफा होऊ शकेल. विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. परदेशातील संपर्कामुळे लाभाची परिस्थिती निर्माण होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.