१ वर्षाने सूर्य स्वराशीत: ७ राशींची भरभराट, पद-पैसा वाढेल; परदेशातून शुभवार्ता, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:47 AM2024-08-13T07:47:06+5:302024-08-13T07:56:35+5:30

वर्षभरानंतर सूर्याचे स्वराशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना फायदेशीर आणि विविध लाभ देणारे ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य कोणत्याही राशीत सुमारे एक महिनाभर असतो. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. सूर्य हा ग्रह अनेक गोष्टींचा कारक असून, त्याचे कुंडलीतील स्थान चांगले असेल, तर त्याचा उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रात सूर्याचे स्थान वरचे आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करत आहे. सिंह राशीचे स्वामित्व सूर्याकडे आहे. सूर्याच्या या गोचर काळाला सिंह संक्रांती असे संबोधले जाईल. सिंह राशीत शुक्र आणि बुध विराजमान आहेत. यामुळे या दोन्ही ग्रहांशी युती होऊन त्रिग्रही बुधादित्य, शुक्रादित्य योग जुळून येत आहे. तसेच राहु आणि शनी यांच्याशी अनुक्रमे षडाष्टक तसेच समसप्तक योग जुळून येत आहे.

१६ ऑगस्ट २०२४ रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या गोचराने काही राशींना उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतात. नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर सकारात्मक अनुकूलता प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल. मुलांच्या बाबतीत येणाऱ्या समस्याही संपुष्टात येतील. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करू शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल. लव्ह लाईफ चांगली जाणार राहू शकेल. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.

मिथुन: नशिबाची पूर्ण साथ मिळू शके. प्रलंबित पैसे, जुनी येणी परत मिळू शकतील. आगामी काळ शुभ राहू शकेल. काही नवीन योजना आखल्या जातील, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकेल. खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत होते त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. जीवनातील भौतिक सुखसोयी वाढू शकतात.

सिंह: आत्मविश्वास, मनोबल वाढू शकेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊन आर्थिक लाभ होऊ शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रातही भरपूर यश आणि नफा मिळू शकतो. कुटुंबात फक्त आनंद असेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळू शेकल. ध्येय साध्य करू शकाल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या: शुभ परिणाम मिळतील. घेतलेले निर्णय मोठे फायदे देतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. लोकांचे कर्ज फेडण्यात यशस्वी होऊ शकाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मन प्रसन्न राहील. आदर वाढेल. कार्यक्षेत्रात कामावर वरिष्ठ अधिकारी खूश असतील.

तूळ: सूर्य गोचर यश मिळवून देऊ शकेल. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन करार करायचा असेल तर त्यासाठीही हा काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. चांगल्या नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. ते हुशारीने निवडण्याचा सल्ला दिला जातो.

वृश्चिक: प्रत्येक क्षेत्रात यशासोबत भरपूर आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीची पूर्ण शक्यता आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. सासरच्या लोकांच्या पूर्ण सहकार्याने आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. काही मोठ्या करारावर किंवा प्रकल्पावर स्वाक्षरी होऊ शकते.

धनु: शुभ परिणाम मिळू शकतील. विचारपूर्वक केलेली रणनीती प्रभावी ठरू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. अध्यात्मात रुची वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठीही काळ अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल. आयुष्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.