Sun In Pisces 2022: सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 07:46 AM2022-03-09T07:46:11+5:302022-03-09T07:50:09+5:30

Sun In Pisces 2022: सूर्याच्या प्रवेशाने मीन राशीत जुळून येणारा बुधादित्य योग नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वर्षभरातनंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशी प्रवेश करत आहे. १४ मार्च २०२२ रोजी सूर्य मीन राशीत पुढील महिनाभरासाठी विराजमान होणार आहे.

सूर्याचा मीन राशीतील प्रवेशानंतर नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध २४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीतील सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे अतिशय शुभ मानला गेलेला बुद्धादित्य योग जुळून येत आहे.

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार आणि बुद्धिमत्ता देणारा ग्रह म्हणतात. यासोबतच सूर्य ग्रह व्यक्तीला मान-प्रतिष्ठा देतो. सूर्य आणि गुरु मित्र ग्रह मानले जातात. तसेच सूर्याच्या मीन प्रवेशामुळे जुळून येत असलेला तीग्रही योग संपुष्टात येईल.

सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाचा बाराही राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, काही राशीच्या व्यक्तींवर हा शुभफलदायक ठरू शकतो. पुढील महिनाभरासाठी या राशीच्या व्यक्तींना अनेकविध लाभ होऊ शकतील. नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी, ते जाणून घेऊया...

सूर्याचा मीन राशीतील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढा राहील. आत्मविश्वासात कमालीची वाढ होऊ शकेल. मिळालेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडू शकाल. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम कालावधी ठरू शकेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. कार्यालयात वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल.

सूर्याचा मीन राशीतील प्रवेशाचा मिथुन राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळू शकेल. सरकारी नोकरीत असलेल्यांना पदोन्नतीचे संकेत आहेत. भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला कालावधी. यश आणि प्रगतीचे मार्ग साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला जात आहे.

सूर्याचा मीन राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकेल. विरोधक आणि हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. प्रामाणिकपणे काम केल्याने या सगळ्यांवर मात करू शकाल. कार्यक्षेत्रात स्वतः सिद्ध करण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतील. यश, प्रगती साध्य करू शकाल. मानसिक शांतता, समाधानाची अनुभूती घेऊ शकाल.

सूर्याचा मीन राशीतील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चांगला ठरू शकेल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. आत्मविश्वास वाढू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला कालावधी. परंतु, कोणत्याही वादात न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत काही अडचणी येऊ शकतात. मात्र, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे उपयुक्त ठरू शकेल.

सूर्याचा मीन राशीतील प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरू शकेल. करिअरमध्ये अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश, प्रगतीचे मार्ग साध्य करू शकाल. कार्यक्षेत्रात आपली प्रतिमा उंचावू शकेल. विद्यार्थ्यांसाठी आगामी महिना उत्तम ठरू शकेल.