१ महिना लाभ! सूर्याचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशींना अनुकूल, अपार यश-प्रगती; गुढीपाडवा शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:04 AM2023-03-16T04:04:04+5:302023-03-16T04:04:04+5:30

गुढीपाडव्याआधी होत असलेला सूर्याचा मीन राशीतील प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या मीन प्रवेशाने सूर्याचे सर्व राशीतील भ्रमण पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात मंगळाचे स्वामित्व असलेल्या पहिल्या मेष राशीत विराजमान होईल. सूर्याच्या मेष प्रवेशाने नवे सौर वर्ष सुरू होईल. मीन राशीत सूर्यासोबत गुरू आणि बुधही विराजमान असतील.

सूर्य बुधाच्या युतीमुळे मीन राशीत बुधादित्य नामक राजयोग जुळून येईल. गुरु आणि सूर्य मित्र ग्रह मानले गेले आहेत. तब्बल १२ वर्षानंतर सूर्य आणि गुरू मीन राशीत एकत्रित विराजमान होतील. पुढील महिनाभर सूर्य मीन राशीत असेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला मीन संक्रांत असेही संबोधले जाते.

सूर्याचा मीन प्रवेश अनेकार्थाने शुभ मानला गेला आहे. सूर्याच्या मीन प्रवेशाचा सर्व राशींवर प्रभाव पाहायला मिळू शकेल. मात्र काही राशींवर सूर्यदेवाची कृपा होऊन अनेकविध प्रकारचे लाभ या आगामी काळात मिळू शकतात. याशिवाय मराठी नववर्ष सुरु होत आहे. गुढीपाडव्याआधी होत असलेले सूर्याचे राशीसंक्रमण तुमच्यासाठी कसे असेल? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश संमिश्र ठरू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. विशेष खबरदारीची गरज आहे, निष्काळजीपणामुळे नुकसान होईल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात सन्मान वाढेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडा संयमाने बाळगावा, घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. भागीदारीत कोणताही निर्णय घेऊ नका. भागीदारीच्या कामात सावध राहण्याची गरज आहे. स्वत:वरचा आत्मविश्वास कायम ठेवावा लागेल. अन्यथा लोक कमतरतेचा फायदा घेऊ शकतात. मुलाच्या बाजूने काही समस्या येऊ शकतात. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. मानसिक ताणतणाव कमी होईल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. उदरनिर्वाहाचे नवीन साधन मिळेल. मानसिक सुख प्राप्त होईल. तेलकट आणि मसालेदार अन्न कमी करा. शांतता आणि संयम राखण्याची गरज आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अतिशय शुभ ठरू शकेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. आळशीपणामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकेल. कामावर लक्ष केंद्रित करावे. लाभ मिळू शकतील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यवसायात लाभ होऊ शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळे नफाही मिळेल. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश लाभदायक ठरू शकेल. व्यवसायात भरपूर कमाई करता येऊ शकेल. जुन्या मित्राला भेटू शकाल. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर ठरेल. कोणतेही काम करण्याची घाई करू नका. संयमाने आणि विचारपूर्वक काम करणे हिताचे असेल. राजकारण आणि सरकारी क्षेत्रातील कामात यश मिळू शकेल. संपत्तीशी संबंधित कामात फायदा होऊ शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. संयमाने काम करावे. मित्र आणि नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. निर्यातीशी संबंधित काम करणाऱ्यांना या काळात चांगली कमाई करता येईल. नशिबाची उत्तम साथ लाभेल. पैसे कमावण्याची संधी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. दीर्घकालीन समस्येतून मुक्तता मिळण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती सामान्य राहील. दुसऱ्यांचे ऐकून निर्णय घेऊ नयेत. बुद्धिमत्तेने आणि विवेकाने काम करा. मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात पुढे जाण्यासाठी कामावर लक्ष केंद्रित करावे. इकडच्या-तिकडच्या गोष्टींकडे लक्ष न देणे उपयुक्त ठरू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश खूप फलदायी ठरू शकेल. जो काही निर्णय घ्याल त्याचा फायदा होईल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जोखीम घेणे टाळा. कायदेशीर बाबींमध्ये धोका पत्करणे टाळावे. बेकायदा काम करणे टाळावे.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश चांगला ठरू शकेल. प्रकृतीची खूप काळजी घ्यावी लागेल. कामे सहज पूर्ण होऊ शकतील. आदर वाढेल. आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश सर्वसाधारणपणे अनुकूल राहू शकेल. कुटुंबासोबत फिरायला जायचे प्लान आखू शकता. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा. भावंडांसोबतच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. हा बदल हिताचा असू शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल. खेळात यश मिळू शकते. स्पर्धेत यश मिळू शकेल. जीवनात समतोल साधण्याची गरज आहे. वैयक्तिक संबंध चांगले होऊ शकतील.

मीन राशीत सूर्याचा प्रवेश होत आहे. पुढील महिनाभर सूर्य याच राशीत असेल. या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ सकारात्मक ठरू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. परंतु, अतिआत्मविश्वास टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते. पैशाच्या बाबतीतही हे संक्रमण सकारात्मक असेल. व्यवसायात लाभ होईल. अनावश्यक विचार टाळणे हिताचे ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.