कन्या संक्रांत: सूर्याच्या कन्या प्रवेशाने २ शुभयोग; ‘या’ राशींना महिनाभर लाभ, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 03:15 PM2022-09-17T15:15:15+5:302022-09-17T15:15:15+5:30

सूर्य कन्या राशीत प्रवेश करत असून, पुढील महिनाभर कन्या संक्रांत असणार आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेल्या सूर्य १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करत आहे. आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून सूर्य बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत पुढील महिनाभर विराजमान असेल. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हणतात. त्यामुळे सूर्याच्या कन्या प्रवेशाला कन्या संक्रांत असे म्हटले जाते. (sun transit in virgo 2022)

सूर्याने कन्या राशीत प्रवेशाने नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहासोबत युती होऊन शुभ मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येत आहे. या योग चांगला मानला जातो. याशिवाय, काही दिवसांनी शुक्रही कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या कन्या प्रवेशानंतरही सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांचा मिळून त्रिग्रही योग जुळून येत असून, हाही एक उत्तम शुभ योग मानला जातो. (surya gochar in kanya rashi 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह मान-सन्मान, आदर, नेतृत्व गुण, तेजकारक मानला जातो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा देखील आहे. अशा स्थितीत, सूर्याचे राशीसंक्रमण सर्व राशींवर परिणाम करते. तुमची रास कोणती, सूर्याचा कन्या राशीतील प्रवेश सर्व राशींवर कसा परिणाम करेल, हे जाणून घेऊया. (kanya sankranti 2022)

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. प्रेम जीवनात रागावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.स्वतःला शांत ठेवा.तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवू शकता. याचा उपयोग नातेसंबंध दृढ करण्यात होऊ शकेल.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत करिअरमध्ये अनुकूल ठरू शकेल.तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवर वेगळी छाप पाडू शकाल. विद्यार्थी वर्गातील लोक कोणतेही यश मिळवू शकतात. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे उपयुक्त ठरू शकेल. वडिलोपार्जित व्यवसायात असलेल्या व्यक्ती भविष्यात नवीन योजना राबवून नफा कमवू शकतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत चांगला ठरू शकेल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी हा चांगला काळ ठरू शकेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामगिरीत सुधारणा होऊ शकेल. परंतु, मालमत्ता खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही निष्कर्षावर येणे तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत अनुकूल ठरू शकेल. या कालावधीत अतिरिक्त तुमच्यावर जबाबदाऱ्या येऊ शकतील. तुमचे वैवाहिक जीवन सामान्य असेल. विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. तुमच्या वडिलांशी संबंध चांगले राहतील आणि ते तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक करतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. राशीस्वामीच्या गोचराने संपत्तीत वाढ होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात, घरातील वरिष्ठांशी संवाद साधताना थोडी सावधगिरी बाळगा आणि संयम ठेवा. वडिलोपार्जित व्यवसायात असलेल्या व्यक्ती भविष्यात नवीन योजना राबवून नफा कमवू शकतात.

सूर्याचा कन्या राशीत होत असलेला प्रवेशाचा या राशीच्या व्यक्तींना सामान्य ठरू शकेल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येऊ शकेल. तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयम बाळगावा. या काळात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. या दरम्यान निष्काळजीपणामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचा खर्चही वाढू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरू शकेल. अनावश्यक खर्चांवर ताबा ठेवावा लागेल. तुमचे विरोधकही सक्रीय राहू शकतात, त्यांच्यापासून सावध राहा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत लाभदायक ठरू शकेल. सूर्य तुमच्या लाभस्थानात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. इतकेच नाही तर या राशीच्या व्यावसायिकांना चांगले करारही मिळू शकतात. तुम्ही भविष्याबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत सुखकारक ठरू शकेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात आनंददायी परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात लोक तुमच्या बोलण्याला खूप महत्त्व देतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचाही पाठिंबा मिळेल. या काळात आध्यात्मिक कार्यात रुची वाढू शकते. आरोग्य चांगले राहू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या कृतींबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. संयम आणि शांततेने गोष्टी हाताळणे सोयीस्कर ठरेल. अन्यथा मान-सन्मानावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. संपूर्ण परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कुटुंबात आपले मत मांडू नका.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. या कालावधीत तुम्हाला कोणाशीही वाद घालू नका. प्रत्येक परिस्थितीत शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्तरावर काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे तणावाखाली येऊ शकता. तुम्हाला तुमचे बजेट लक्षात घेऊन कोणतेही काम करण्याचा सल्ला दिला जातो.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याची कन्या संक्रांत संमिश्र ठरू शकेल. आपल्या जोडीदाराच्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही. या दरम्यान कामाच्या ठिकाणी कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, सूर्याच्या कन्या संक्रांतीचा तुमच्यावरील प्रभाव जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.