बुध-सूर्य राजयोग: ८ राशींवर शनीकृपा, अनपेक्षित लाभ; सुख-सौभाग्य काळ, शेअर बाजारात नफा शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 09:11 AM2024-11-09T09:11:24+5:302024-11-09T09:11:24+5:30

सूर्याचे राशी गोचर आणि शनीचे मार्गी होणे अनेक राशींना उत्तम फलदायी, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नोव्हेंबर महिना सुरू आहे. या महिन्यात शुक्र ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरु यांचा परिवर्तन राजयोग तयार झाला आहे. यानंतर आता नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या वृश्चिक राशीतील गोचरानंतर आगामी काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाईल.

१६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत विराजमान होत आहे. सुमारे महिनाभर सूर्य वृश्चिक राशीत असणार आहे. त्यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत मार्गी होणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी असून, यामुळे शश नामक राजयोग निर्माण झाला आहे.

वृश्चिक राशीत विद्यमान घडीला बुध ग्रह विराजमान आहे. सूर्य ग्रहाच्या प्रवेशानंतर बुधादित्य नामक राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे आगामी काळ सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग आणि शनीचे मार्गी होणे काही राशींसाठी उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुख आणि संपत्तीच्या बाबतीत काळ फायदेशीर ठरू शकेल. काही मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर यश मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत असा बदल होईल ज्याचा विचार केला नसेल. अनेक सकारात्मक बदल दिसू शकतील.

कर्क: अध्यात्माकडे अधिक कल राहील. करिअरच्या क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतो. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पदोन्नतीसह आर्थिक लाभ होऊ शकतो. सर्वजण कामाचे कौतुक करतील. व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहू शकेल. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडू शकतात. ट्रेडिंगद्वारे भरपूर पैसे कमवू शकता. आनंददायी घटना घडू शकतील.

सिंह: यशासोबत आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी देऊ शकतात. कामात समाधानी राहू शकता. व्यवसायात फायदा होईल. शेअर बाजारातून भरपूर पैसे कमवू शकता. सौभाग्यकारक कालावधी ठरू शकेल. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळू शकेल. वैवाहिक जीवन आनंददायी ठरू शकेल.

तूळ: वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळेल. संवाद अधिक घट्ट होईल. पैसे वाचवू शकाल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कामाचे कौतुक केले जाऊ शकते. नवीन करार होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकता.

धनु: सुख लाभू शकेल. भाग्यवान ठरू शकाल. मोठी कामे संयमाने आणि विवेकबुद्धीने पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरदारांसाठी काळ फायदेशीर राहू शकेल. काही मोठे यश आणि सन्मान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी कामाची प्रशंसा करतील. प्रेम जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकेल.

मकर: हा कालावधी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. संपत्तीचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतील. व्यवसायात पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतील. संपत्ती वाढू शकेल. गुंतवणुकीतून नफा होऊ शकेल. या काळात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकेल. या काळात तुम्हाला शेअर मार्केट, लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.

कुंभ: आगामी काळ लाभदायक सिद्ध होऊ शकतो. कामात आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. जे बेरोजगार आहेत त्यांना लाभ मिळू शकतो. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात. जे काही नवीन करण्याचा विचार करत आहात, तो तुमचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकेल.

मीन: मेहनतीचे फळ मिळू शकेल. अपेक्षित लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामात खूप व्यस्त असाल. पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ राहू शकेल. प्रभावशाली लोकांशी भेट होईल जे भविष्यात लाभ मिळवण्यात मदत करतील. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वास आणि जवळीक वाढू शकेल. नोकरदार महिलांचा सन्मान घर आणि ऑफिसमध्ये वाढू शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.