Surya Gochar 2022 : सूर्याचं कर्क राशीत गोचर; महिनाभर या राशीच्या लोकांसाठी कठीण काळ, खर्च वाढणार By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 02:15 PM 2022-07-15T14:15:35+5:30 2022-07-15T14:20:30+5:30
Surya Gochar 2022 : १६ तारखेला सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. याचा काही राशींवर प्रतिकूल परिणाम दिसणार असून तो १७ ऑगस्टपर्यंत कायम राहिल. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा ग्रह दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या वेळी सूर्य १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. अग्नि तत्व ग्रह सूर्याचे जल तत्व राशी कर्कमध्ये जाणे हा एक मोठा बदल मानला जात आहे.
या बदलानंतर जिथे हवामानात मोठे बदल पाहायला मिळतील, तिथे ४ राशींसाठी प्रतिकूल कालावधी सुरू होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना करिअर आणि पैशांसह सर्वच बाबतीत आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या चार राशी.
मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं हे गोचर काही बाबतींमध्ये आव्हानात्मक ठरू शकते. या कालावधीत आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तसंच आपल्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी बोलताना मृदू भाषेचा वापर करा. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सामाजिक स्तरावर आपलं म्हणणं पटवून देत तुम्ही लोकांवर आपला प्रभाव सोडू शकता. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांची साथ मिळेल, त्यामुळे शिक्षणातील सर्व अडथळे दूर होतील.
सिंह - सूर्य तुमच्याच राशीचा स्वामी आहे. परंतु कर्क राशीतील गोचरदरम्यान तो तुमच्या द्वादश भावात विराजमान होईल. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या किंवा परदेशाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. या कालावधीत प्रकृतीची काळजी घ्यावी. तसंच योग्य आहार घ्यावा. नोकरदार वर्गानं जमापूंजीचा वापर करताना विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकता.
धनू - जे लोक नकारात्मक चर्चा करत असतात त्यांचापासून थोडं लांब राहणं फायद्याचं ठरू शकतं. या कालावधीत तुमच्या प्रकृतीवर लक्ष द्या. वडिलांसोबत काही खटके उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही लोकांना अचानक धनलाभाचेही योग संभवतात.
कुंभ - जर तुम्ही कोणत्याही कोर्टाच्या कामात अडकला असाल तर या दरम्यान विचारपूर्वक निर्णय घ्या. या कालावधीत तुम्हाला पोटासंबंधित विकार उद्भवण्याची शक्यता आहे. सामाजिक स्तरावार संवाद साधताना शब्दांचा काळजीपूर्वक वापर करा. तुम्ही तुमच्या शत्रूंवर सहजरित्या विजय मिळवू शकता.