वृश्चिक संक्रांत: ‘या’ ६ राशींना मिळतील अनेकविध लाभ, उत्तम संधींचा काळ; सूर्य शुभ-शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:31 PM2022-11-13T12:31:07+5:302022-11-13T12:38:38+5:30

सूर्याचे राशीसंक्रमण काही राशींसाठी अतिशय चांगले ठरणारे असून, आगामी महिनाभर याचा प्रभाव राहू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नोव्हेंबर महिन्यात शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान होत आहे. सूर्य प्रत्येक महिन्याला रास बदलत असतो. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत असे म्हटले जाते. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्यामुळे आगामी काळ हा वृश्चिक संक्रांत म्हणून ओळखला जाईल. (surya gochar in vrishchik rashi 2022)

सूर्य १६ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करत असून, पुढील महिनाभर याच राशीत सूर्य विराजमान असेल. सूर्याचे हे संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. सूर्य मंगळाच्या राशीत असेल आणि मंगळासोबत सूर्याचा समसप्तक योग तयार होईल. अनेक राशींसाठी सूर्याचे वृश्चिक राशीत आगमन खूप फायदेशीर ठरू शकेल. या कालावधीत वृश्चिक राशीत बुधादित्य योग तयार होत आहे. (vrishchik sankranti 2022)

वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्य वृश्चिक राशीत आल्याने खूप फायदा होईल. वृश्चिक राशीव्यतिरिक्त इतरही अनेक राशी आहेत, ज्यांच्यासाठी सूर्याचे हे संक्रमण विशेष लाभदायक ठरु शकेल. सूर्याच्या वृश्चिक संक्रांतीचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडू शकेल, ते जाणून घेऊया... (sun transit in scorpio 2022)

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृश्चिक संक्रांत चांगली ठरू शकेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. नशिबाची साथ लाभेल. संधीचा पुरेपूर फायदा घ्या. मेहनतीने यश मिळवू शकाल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. प्रवासाची संधीही मिळेल. आर्थिक आघाडीवर हा काळ खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. नातेवाईकांकडून लाभ होईल.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृश्चिक संक्रांत आनंददायी ठरू शकेल. भौतिक सुखाचा लाभ घेता येईल. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल राहील. गुंतवणुकीतून नफा मिळेल. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव आणि स्थान सुधारू शकता. प्रयत्न यशस्वी होतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृश्चिक संक्रांत शुभ फलदायी ठरू शकतो. तुम्हाला बचतीच्या अनेक संधी मिळतील. या काळात तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. जोडीदारासोबत मिळून कोणतीही गुंतवणूक केली तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल.

वृश्चिक राशीत होत असलेला सूर्याचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. तुमच्या कामातून आणि व्यवसायातून तुम्हाला यश आणि लोकप्रियता मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. तब्येतीत सुधारणा होऊ शकेल. या कालावधीचा पुरेपूर फायदा घ्या.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृश्चिक संक्रांत लाभदायक ठरू शकेल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. व्यावसायिकांना खूप अनुकूल कालावधी ठरू शकेल. तुमची प्रगती आणि बढती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या यशस्वी नेतृत्वाची प्रशंसा होईल. आईची पूर्ण साथ मिळेल.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याची वृश्चिक संक्रांत यशकारक ठरू शकेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांची योजना यशस्वी होऊ शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि गुरूंचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिक आघाडीवरही पूर्ण सहकार्य मिळू शकेल. तुमची आवड अध्यात्माकडे अधिक असेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.